कोल्हापुरात लाइव्ह व्हिडिओ करीत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:38+5:302020-12-05T04:57:38+5:30

कोल्हापूर : मोबाइलवर लाइव्ह व्हिडिओ करीत एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आर. के. नगरातील हरी पार्क, पोस्टल ...

Suicide by strangling a married woman doing live video in Kolhapur | कोल्हापुरात लाइव्ह व्हिडिओ करीत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

कोल्हापुरात लाइव्ह व्हिडिओ करीत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

कोल्हापूर : मोबाइलवर लाइव्ह व्हिडिओ करीत एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आर. के. नगरातील हरी पार्क, पोस्टल कॉलनीत बुधवारी मध्यरात्री घडली. धनश्री अप्पा जाधव (२५, सध्या रा. आर. के. नगर, कोल्हापूर. मूळ गाव एरंडोळ, ता. आजरा) असे मृत महिलेचे नाव आहे. उदय पालकर (रा. आर. के. नगर) या घरमालकांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

धनश्री जाधव यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. तो आई-वडिलांकडे असतो. त्या पतीपासून विभक्त राहत होत्या. पुण्यात दोन वर्षे खासगी नोकरी करून त्या गेली वर्षभर कोल्हापुरात आर. के. नगरातील पालकर यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होत्या. एका बँकेच्या क्रेडिट कार्ड मार्केटिंगचे काम त्या करत होत्या. त्यांची कोल्हापुरात एकासोबत मैत्री जमली होती. बुधवारी रात्री त्यांनी मित्राशी संवाद साधला. त्यानंतर विवाहितेने गळफास लावून आत्महत्या करीत असल्याचे मोबाइलवरून व्हिडिओ मित्राला पाठविला. त्यावेळी मित्राने धनश्री जाधव राहत असलेले घर गाठले. मित्राने घरमालक पालकर यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी दार ठोठावून धनश्रीला दार उघडण्याबाबत विनंती केली; पण प्रतिसाद न आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांनी छताच्या पंख्याला वायरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

खोलीमध्ये मिळालेल्या सुसाईड नोटवर आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असा मजकूर आहे. त्यामुळे त्यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज करवीर पोलिसांनी व्यक्त केला.

--------------------------------

भविष्यकाळ वाईट आहे...

धनश्री जाधव या माझा भविष्यकाळ वाईट आहे, असे वारंवार मित्रांना सांगत होत्या. स्वभावाने हट्टी होती, असे तिच्या आई-वडिलांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

--------------------------------

व्हिडिओ जप्त

आत्महत्या करीत असल्याचा मोबाइलवरील व्हिडिओ विवाहितेने तिच्या मित्राला पाठविला होता. तो व्हिडिओ करवीर पोलिसांनी जप्त केला.

Web Title: Suicide by strangling a married woman doing live video in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.