हणबरवाडी येथील वृद्धेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 17:10 IST2021-02-17T17:08:06+5:302021-02-17T17:10:17+5:30

कोगनोळी : हणबरवाडी येथील वृद्ध महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी  सकाळी उघडकीस आली. इंदुबाई शंकर चव्हाण ...

Suicide of an old man at Hanbarwadi | हणबरवाडी येथील वृद्धेची आत्महत्या

हणबरवाडी येथील वृद्धेची आत्महत्या

ठळक मुद्देहणबरवाडी येथील वृद्धेची आत्महत्यामृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

कोगनोळी : हणबरवाडी येथील वृद्ध महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी  सकाळी उघडकीस आली. इंदुबाई शंकर चव्हाण उर्फ कळसकर (वय 76, मुळगाव दानवाड, ता. शिरोळ, सध्या रा. हणबरवाडी ता. निपाणी) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दानवाड , तालुका शिरोळ येथील इंदुबाई शंकर चव्हाण या मावस लेक आक्काताई तुकाराम यादव यांच्या हणबरवाडी येथील घरी गेल्या तीस वर्षापासून राहत होत्या. गेल्या दोन-तीन वर्षापासून त्या आजारी होत्या.

रविवारी इंदुबाई घरातून बाहेर पडल्या व सायंकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत. नातलगांनी चार दिवसापासून नातेवाईक, पाहुणे आसपासच्या परिसरात शोधाशोध केली. पण त्या मिळाल्या नाहीत. हणबरवाडी येथे गावालगतच असणाऱ्या बंडा भिमराव खोत यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे.

ऊसतोड मजुर पाणी आणण्यासाठी गेले असता विहिरीमध्ये इंदुबाई यांचा मृतदेह असल्याचे दिसून आले. लागलीच निपाणी येथील ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवण्यात आले.

घटनास्थळी निपाणी पोलिसांच्यावतीने अमर चंदनशिव, एम एन खानापनावर, संजय काडगौडर, प्रकाश सावजी यांनी पाहणी करून सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Web Title: Suicide of an old man at Hanbarwadi