कळंबा तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 19:15 IST2022-02-28T18:50:35+5:302022-02-28T19:15:02+5:30

पोट दुखत असल्याने काल सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सोमवारी सकाळी दवाखान्यातून नितीन कोणालाही न सांगता निघून गेला होता.

Suicide of a youth by jumping into Kalamba lake, the cause is still unclear | कळंबा तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

कळंबा तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

कळंबा : कळंबा तलावाच्या मनोऱ्याच्या पूर्वेस तलाव पात्रात उडी घेऊन संभाजीनगर परिसरातील एका विवाहित युवकाने आत्महत्या केली. नितीन कुंडलिक पाटील (वय ३८, रा. गजानन महाराज कॉलनी) असे या युवकाचे नाव आहे. आत्महत्येपूवी तलावाच्या काठावर कोल्हापुरी चप्पल, पाकिट ठेवून त्याने तलावात उडी घेतली. आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत करवीर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत माहिती अशी की, संभाजीनगर प्रभागात गजानन महाराज नगरात नितीन पाटील आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. घरी पत्नी दोन मुली असून दोन महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नितीन काम करत होता. मात्र काही दिवसापासून तो कामावर नव्हता.

काल, रविवारी पोट दुखत असल्याने त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी दवाखान्यातून नितीन कोणालाही न सांगता निघून गेला होता. सदरची बाब नितीनच्या पत्नीने त्याच्या मित्रांना कळवली होती. सोमवारी सायंकाळी चार वाजता तलावावर फिरावयास येणाऱ्या नागरिकांना कळंबा तलावात मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी ही बाब कळंबा पोलीस पाटीलाना कळवली.

घटनास्थळी तात्काळ करवीर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत सीपीआर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून करवीर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Suicide of a youth by jumping into Kalamba lake, the cause is still unclear