कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 18:25 IST2017-09-28T18:23:24+5:302017-09-28T18:25:21+5:30
करंजफेण, दि. ८ : पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव येथील संभाजी यशवंत पाटील (वय ५०) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली.

कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या
करंजफेण, दि. ८ : पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव येथील संभाजी यशवंत पाटील (वय ५०) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली.
संभाजी पाटील यांनी गावातील एका सहकारी सोसायटीतून व कोतोली येथील एका बँकेतून शेतीसाठी दीड लाखापर्यंत कर्ज घेतले होते. त्यामुळे ते नियमित चिंतेत असल्याचे त्याच्या घरच्यांकडून समजते.
कर्जाला कंटाळून त्यांनी बुधवारी रात्री विष प्राशन केले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूरात सी.पी.आर.रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत निघाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारादरम्यान गुरूवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.