शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! उसाला मिळणार एकरी ५३ हजार रुपये पीककर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:53 IST

खतांसह मजूर व मशागतीच्या वाढलेल्या किमतीमुळे पीककर्ज वाटपात वाढ

राजाराम लोंढेकोल्हापूर : खतांसह मजूर व मशागतीच्या वाढलेल्या किमतीमुळे पीककर्ज वाटपात वाढ करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने वाढीव पीककर्जाचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे पाठविला आहे. उसासाठी एकरी ५२ हजार ८०० रुपये पीककर्ज मिळणार असून, सध्याच्या कर्जापेक्षा सुमारे नऊ हजार एकरी वाढ होणार आहे.

जिल्ह्यात विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले जाते. पीककर्जाशिवाय शेतीपूरक व्यवसायासाठी ‘मध्यम मुदत’ व ‘खावटी’ कर्जही विकास संस्थांच्या माध्यमातून दिले जाते. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना बिनव्याजी पीककर्ज देण्याचा निर्णय घेतल्याने पीककर्ज उचलीचे प्रमाण वाढले आहे.कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून २ लाख ९० हजार शेतकरी १८०० कोटी पीककर्ज घेतात. त्याशिवाय ५०० कोटी मध्यम मुदत तर, ४०० कोटी खावटी कर्जाचे वाटप केले जाते.

कोल्हापूूर जिल्ह्यात ४ लाख २५ हजार हेक्टर एकूण पिकाऊ क्षेत्र आहे. त्यापैकी ३ लाख ९३ हजार हेक्टर खरीप पिकांचे क्षेत्र असून, त्यातील २ लाख हेक्टरवर उसाची लागवड होते. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने पीककर्जाचे वाटपही अधिक होते. सध्या उसासाठी एकरी ४३ हजार २०० रुपये प्रमाण वाटप केले जाते. त्याप्रमाणात खरीप भात व रब्बीसाठी कर्ज वाटप केले जाते.

गेल्या वर्षभरात खतांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. खताच्या ५० किलो पोत्यामागे ४०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्याचबरोबर मजुरीमध्ये दुप्पट वाढ झाली असून, पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने मशागतीचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. शेती करताना खर्चाचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.यासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने पीककर्ज मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उसासाठी आता ५२ हजार ८०० रुपये मिळणार आहेत. उन्हाळी भातासाठी एकरी २२ हजार ४०० तर, उन्हाळी भुईमुगासाठी १७ हजार ६०० रुपये पीककर्ज मिळणार आहे.

असे मिळणार हेक्टरी पीककर्ज -पीक                   एकरी कर्जऊस                   ५२ हजार ८००खरीप भात         २३ हजार २००उन्हाळी भात      २२ हजार ४००खरीप ज्वारी       ११ हजार ६००उन्हाळी भुईमूग  १७ हजार ६००सोयाबीन           १९ हजार ६००रब्बी ज्वारी        १२ हजार ४००

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी