शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

Accident News Kolhapur: ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून दुचाकीस्वार ठार, पट्टणकोडोलीत झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 18:55 IST

सासरवाडीकडे जात असतानाच काळाचा घाला

तानाजी घोरपडेहुपरी : ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. महादेव बाबू बिरनाळे - कोळी (वय ४९, रा. वसगडे मळा, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. सासरवाडी मांगूर (ता. निपाणी ) येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे हा अपघात झाला. अपघाताची नोंद हुपरी पोलिसात झाली आहे. याबाबत माहिती अशी की, महादेव बिरनाळे हे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करत होते. काल, शुक्रवारची रात्रपाळी संपवून वसगडेतील आपल्या घरी सकाळी येवून सासरवाडी मांगूरकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी मोपेड दुचाकी क्रमांक (एम.एच-०९- ईपी-९६०१) वरून जात होते. पट्टणकोडोली बस स्थानकानजीक ऊसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टर (एमएच २३ टी ४७९८) ट्रॉलीला ओलांडून पूढे जात असतांना त्यांना ट्रॉलीचा धक्का लागला. यात ते दुचाकीवरुन रस्त्यांवर पडले. दरम्यान ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू