शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

Kolhapur: उत्तूरमधील ऊस पिके करपली, शेतकरी चिंताग्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:16 IST

उत्कर्षा पोतदार  उत्तूर: उन्हाळ्यात दरवर्षी पडणारा वळीव पाऊस उत्तूरला अजूनही न पडल्याने ऊस पिके करपू लागली आहेत. शेतकरी पाण्याची ...

उत्कर्षा पोतदार उत्तूर: उन्हाळ्यात दरवर्षी पडणारा वळीव पाऊस उत्तूरला अजूनही न पडल्याने ऊस पिके करपू लागली आहेत. शेतकरी पाण्याची उसनवारी करून ऊस पिक जगवण्यासाठी धडपडत आहेत. आजूबाजूच्या गावात वळीव पाऊस झाला असला तरी उत्तूरला वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वळीव पाऊस  झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पिक घेतले. विहिरी व कुपनलिकेचे अपुरे पाणी असले तरी वळीव पावसाच्या जोरावर ऊस पिक चांगले आले होते. यावर्षी मात्र वळीव पावसाने पाठ फिरवल्याने ऊसकरी शेतकरी त्रस्त झाले आहेत. चार दिवस दिवसपाळी व तीन दिवस रात्रपाळी असा शेतीसाठीचा वीजपुरवठा असल्याने ऊसाला पाणी देण्यात देखील शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. कुपनलिकेतील पाण्याची पातळीही उष्णतेने खाली जात आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने जमिनीला भेगा पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण पिकाला पाणी देणे अशक्य होऊन बसले आहे. शेतकरी वळीव पाऊस कधी पडेल याकडे डोळे लावून बसले आहेत. सायंकाळी ढगाळ वातावरण होते. काही वेळेला विजांचा कडकडाट होतो. मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. परिणामी यावर्षी उत्तूर  परिसरातील ऊस उत्पादन घटल्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

सूर्यकिरणांची तीव्रता वाढलेल्या उष्णतेमुळे ऊस पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता आहे. वळीव पाऊस नसल्याने उसाने काही ठिकाणी मान टाकली आहे. शेजारच्या उपनलिकेचे पाणी उसणवारीने घेऊन पीक जगवण्याची धडपड सुरू आहे. - सुरेश कुंभार- शेतकरी 

आजरा, गडहिंग्लज व गारगोटी अशा उत्तुरच्या सभोवतीच्या गावात वळीव पाऊस झाला. मात्र उत्तुरला अजिबात पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऊस पिक वाचवणे जिकरीचे झाले आहे. अजूनही पावसाला दीड दोन महिने असल्याने ऊस पीकासाठी पाणी कुठून आणणार अशी अडचण आहे. - आयेशा ढालाईत  - शेतकरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी