शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 11:08 IST2025-11-02T11:07:58+5:302025-11-02T11:08:57+5:30
शिरोळ येथे ऊस दरावरून आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी कुरुंदवाड शहर बंदला सकाळपासूनच प्रतिसाद मिळाला.

शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
कुरुंदवाड : ऊस दराचा समाधानकारक तोडगा न निघाल्याने तालुक्यातील ऊस आंदोलक आक्रमक झाले असून शनिवारी मध्यरात्री तेरवाड, मजरेवाडी, बस्तवाड येथे अज्ञात आंदोलकांनी ऊस वाहने पेटवून देणे, वाहन पंक्चर करण्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे ऊस वाहतूकधारकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरोळ येथे ऊस दरावरून आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी कुरुंदवाड शहर बंदला सकाळपासूनच प्रतिसाद मिळाला. ऊस दराबाबत विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. साखर कारखानदारांनी या आंदोलनाची दखल न घेता ऊसतोडी सुरू केल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. शनिवारी रात्री तेरवाड येथून ऊस वाहतूक करणाऱ्या छकडा बैलगाडीचे चाक अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिले. तर बस्तवाड, मजरेवाडी येथेही ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची वाहने पंक्चर करणे, पेटवून देण्याचे प्रकार घडल्याने वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.