Suddenly I was hit by a car moving in Waghbil Ghat | वाघबीळ घाटात वर्दळीच्या रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

वाघबीळ घाटात वर्दळीच्या रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

ठळक मुद्देवाघबीळ घाटात चालत्या कारने घेतला अचानक पेट बर्निंग कारचा थरार, अग्निशामक दलाने आणली आटोक्यात आग

पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळ चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने बर्निंग कारचा थरार अनुभवयास मिळाला.फुलेवाडी येथील पाले कुटूंब देवदर्शनासाठी पन्हाळ्याकडे जात असताना दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. वर्दळीच्या रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

घटनास्थळावरून मिळाललेली माहिती अशी, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरून फुलेवाडी (ता.करवीर) येथून चारचाकी गाडीतून इम्रान दिलावर पागे आपल्या कुटूंबासमवेत देवदर्शनासाठी पन्हाळ्याकडे जात होते.दुपारी चारचाकी गाडी नलवडे बंगल्याजवळ आली असता अचानक चालत्या गाडीच्या इंजिनमधून धूर आल्याने गाडी थांबविले.त्यानंतर इंजिनचे झाकण उघडले असता त्यातून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या.

चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीतील पागे कुटूंबियांना सुरक्षित बाहेर काढले.क्षणात अगीचा भडका उडाल्याने संपूर्ण गाडीने पेट घेतली. सुरूवातील रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाश्यांनी पाणी आणि मातीने आग विझविण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. दरम्यान पडवळवाडीचे माजी उपसरपंच पंडीत नवलवडे यांनी १०१ ला फोन केल्याने महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

दरम्यान गोकुळ निवडणूकीसाठी संपर्क दौऱ्यावर असलेले करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी भेदकलेल्या अपघातग्रस्त कुटूंबाला धीर देत विचारपूस केली

Web Title: Suddenly I was hit by a car moving in Waghbil Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.