सोलापूरात केली अटक: सक्सेस लाईफ’चा सुत्रधार विकास लोखंडे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 13:04 IST2020-03-13T13:03:13+5:302020-03-13T13:04:23+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील गुंतवणूकदार आणि एजंटांना आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून सुमारे पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी महिन्यापासून पसार असलेला मुख्य ...

Successful Development of Success Life: Iron Gajaad | सोलापूरात केली अटक: सक्सेस लाईफ’चा सुत्रधार विकास लोखंडे गजाआड

सोलापूरात केली अटक: सक्सेस लाईफ’चा सुत्रधार विकास लोखंडे गजाआड

ठळक मुद्देगुंतवणुकदारांना पाच कोटींचा गंडा; अद्याप एकजण पसार

कोल्हापूर : जिल्ह्यातील गुंतवणूकदार आणि एजंटांना आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून सुमारे पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी महिन्यापासून पसार असलेला मुख्य सूत्रधार विकास लोखंडे (रा. नवे पारगाव, ता. हातकणंगले) याला आर्थिक गुन्हे शाखेने सोलापुरातून अटक केली. 

दाभोळकर चौकातील अमात्य टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर जागा घेऊन सूत्रधार शामराव साळवी आणि विकास लोखंडे याने डिसेंबर २०१२ रोजी 'सक्सेस लाइफ, हेल्दी लाइफ अँड डेव्हलपर्स' या नावाने कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. आकर्षक परताव्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवून त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी गुंतवणूकदारांना सुमारे पाच कोटींचा गंडा घालणा-या सक्सेस लाइफ आणि डेव्हलपर्स कंपनीच्या मुख्य कार्याकारी संचालकांसह सात जणांना यापूर्वी अटक झाली आहे. या रॅकेटचा म्होरक्या, कार्यकारी संचालक संशयित शामराव साळवी (रा. पिशवी, ता. शाहूवाडी) याला काही दिवसांपूर्वी पोलिासांनी मुंबई  ताब्यात घेतले. तर सूत्रधार लोखंडे याला सोलापूरात सापळा रचून पकडले. या प्रकरणातील श्रीपती पाटील (रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) हा अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध सुरु आहे. 
 

 

Web Title: Successful Development of Success Life: Iron Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.