करवीरमध्ये शहरालगतची गावे हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:22 IST2021-04-06T04:22:28+5:302021-04-06T04:22:28+5:30

कोपार्डे : शहराच्या भोवती पसरलेल्या करवीर तालुक्यात कोरोना लसीकरण्यासाठी नागरिकांत उदासीनता दिसत आहे. ४५ वर्षांवरील दीड लाख पात्र नागरिकांपैकी ...

Suburban hotspots in Karveer | करवीरमध्ये शहरालगतची गावे हॉटस्पॉट

करवीरमध्ये शहरालगतची गावे हॉटस्पॉट

कोपार्डे : शहराच्या भोवती पसरलेल्या करवीर तालुक्यात कोरोना लसीकरण्यासाठी नागरिकांत उदासीनता दिसत आहे. ४५ वर्षांवरील दीड लाख पात्र नागरिकांपैकी केवळ २३ हजार ८४१ नागरिकांनी ४ एप्रिलपर्यंत कोविडशिल्ड लस घेतली आहे. आरोग्य विभाग सर्व पातळीवर लोकांत प्रबोधन करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शहरालगतची पाचगाव मोरेवाडी उजळाईवाडी गावे हॉटस्पॉट बनत आहेत.

जिल्ह्यातील सर्वात मोठा अडीच प्लॉटचा करवीर तालुका आहे. या तालुक्यात शहरातील काही भाग, उपनगरांसह ११७ गावे व १२ वाड्या, वस्त्या येतात. पहिल्या टप्प्यात फ्रन्टलाइन कर्मचारी व ४५ वर्षांवरील कोमॉरबिड नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येत होते. मात्र, ४५ वर्षे वयावरील सर्वांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागाकडून तालुक्यातील ९ आरोग्य केंद्रे, १८ उपकेंद्रे खुपिरे ग्रामीण रुग्णालय व गांधीनगर उपजिल्हा रुग्णालय अशा २९ ठिकाणी कोरोना लसीकरणाचे काम सुरू आहे;

पण लोकांच्यातून लसीकरणासाठी उदासीनता दिसत आहे. ४५ वर्षांवरील वयोगटातील दीड लाख पात्र नागरिकांपैकी केवळ २३ हजार ८४१ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. करवीर तालुक्यात शहरालगतच्या पाचगाव, मोरेवाडी, गांधीनगर, उजळाईवाडी ही मोठी गावे शहराशी दररोजचा संपर्क येत असल्याने हॉटस्पॉट बनू लागली आहेत. तालुक्यात २४ जण कोरोनाबाधित आहेत; पण किमान ११२ गावांत कोरोनाला आजअखेर गावाबाहेर रोखण्यात यश मिळवले आहे.

प्रतिक्रिया

शासकीय पातळीवर आरोग्य विभाग तहसीलदार, गटविकास अधिकारी सर्वांनी मिळून लसीकरणासाठी गती देण्याबाबत आराखडा तयार केला आहे. लोकांमध्ये जनजागृती व प्रबोधनासाठी प्रयत्न सुरू असून लसीकरणाची मोहीम आणखी गतिमान करून लवकरात लवकर उद्दिष्ट पूर्ण करणार आहे.

जी. डी. नलवडे. तालुका आरोग्य अधिकारी

लसीकरण

दृष्टिक्षेपात

४५ वर्षांवरील पात्र नागरिक - दीड लाख

लसीकरण - २३ हजार ८४१

एकूण गावे - १२९

लसीकरण केंद्रे - २९

Web Title: Suburban hotspots in Karveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.