शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी प्राध्यापकाबाबत शिवाजी विद्यापीठाला लेखी अहवाल सादर, कुलगुरू निर्णय घेणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:36 IST

मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांनी रोखल्यानंतर त्यांना अपशब्द वापरणाऱ्या या प्राध्यापकाला बेदम चोप दिला

कोल्हापूर : मद्यपान करून आल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांनी रोखल्यानंतर त्यांना अपशब्द वापरणाऱ्या कोल्हापुरातील एका वरिष्ठ प्राध्यापकाला तीन दिवसांपूर्वी सीसीटीव्हीसमोर बेदम चोप दिला होता. याप्रकरणी सुरक्षा विभागाने शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाकडे लेखी अहवाल दिला आहे. याप्रकरणी कुलगुरुंकडे दिलगिरी व्यक्त करून सुटण्याचा संबंधित प्राध्यापक प्रयत्न करत आहे. दरम्यान, या प्राध्यापक महाशयाच्या अनेक सुरस कथा बाहेर पडत आहेत.तीन दिवसांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयातील या मूळच्या सातारच्या प्राध्यापकाने विद्यापीठ परिसरातील एका बारमध्ये रात्री नेहमीपेक्षा जास्त मद्यपान केले. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर त्यांना रोखणाऱ्या सुरक्षा रक्षकाशी वाद घातला आणि नंतर अपशब्द वापरले. अनेकदा समजावूनही न ऐकल्यामुळे अतिशय वाईट शब्दांत रक्षकांशी बोलणाऱ्या या प्राध्यापक महाशयाला सीसीटीव्हीच्या साक्षीने संतप्त सुरक्षारक्षकांनी बेदम चोप दिला.विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिल्यानंतर सुरक्षा विभागाने राजारामपुरी पोलिसांत यासंदर्भात कळविले. पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडविले. परंतु, या प्रकरणी सुरक्षा विभागाने कुलगुरुंना कल्पना दिली होती. रविवारी सुरक्षा विभागाने यासंदर्भातील लेखी अहवाल प्रशासनाला दिला आहे.आदर्श शिक्षक पुरस्काराचा मानकरीसंबंधित प्राध्यापक ज्या महाविद्यालयात तो शिकवितो, तेथे विद्यमान प्राचार्यांनी सूत्रे हाती घेण्यापूर्वी चार वर्षे प्रभारी प्राचार्य म्हणून त्याने काम केले आहे. या काळातील अनेक सुरस कथा बाहेर येत आहेत. विशेष म्हणजे या प्राध्यापकाने २०२४ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कारही स्वीकारलेला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठProfessorप्राध्यापक