शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

‘आयसीयू’त अभ्यास, रुग्णवाहिकेतून परीक्षा

By admin | Updated: March 7, 2015 01:04 IST

‘ज्योती’ची इच्छाशक्ती : हृदयरोगाच्या वेदना सहन करुनही देत आहे दहावीचे पेपर

कोल्हापूर : केवळ प्रखर इच्छाशक्ती, शिक्षणाचा ध्यास यांच्या जोरावर हृदयविकाराच्या मरणयातना सहन करूनही ‘ती’ दहावीची परीक्षा रुग्णवाहिकेतून जाऊन देत आहे. ज्योती पाटील (रा. दिंडनेर्ली, ता. करवीर) असे तिचे नाव आहे. रुईकर कॉलनीतील स्वस्तिक हॉस्पिटलच्या ‘आयसीयू’मध्ये नाकाला आॅक्सिजनची नळी, एका हाताला सलाईन आणि दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन ज्योती अभ्यास करीत आहे. ज्योती धडधाकट होती. परिस्थिती गरिबीची असल्यामुळे अनेक संकटांवर मात करीत तिने नववीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दहावीच्या वर्गात आल्यानंतर तिने वर्षभर जिद्दीने अभ्यास केला. अलीकडे तिला सातत्याने धाप, खोकल्याचा त्रास होऊ लागला. वैद्यकीय तपासणीनंतर तिला हृदयविकाराचा त्रास असल्याचे स्पष्ट झाले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांनी स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी दाखल करून घेतले. तिच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत. दरम्यानच्या काळात मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. परीक्षेच्या वेळीच उपचार घेण्यासाठी दाखल झाल्यामुळे परीक्षा चुकली तर वर्ष वाया जाणार असे तिला वाटू लागले. ही अस्वस्थताच तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिने वारंवार डॉक्टरांकडे परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली. ‘पहिल्यांदा प्रकृती बरी होऊ दे, मग परीक्षा दे,’ असे डॉक्टरांनी तिला सांगितले. मात्र, तिने परीक्षा देणारच असा आग्रह धरला. शेवटी डॉक्टरांचाही नाइलाज झाला. तिच्या मनाविरुद्ध जाणे अवघड झाले. डॉक्टरांनीही तिला ‘आयसीयू’तच अभ्यास करण्याची मुभा दिली. इस्पुर्ली येथील परीक्षा केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध केली. त्यामुळे ती दहावीची परीक्षा देत आहे.