शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणार : कामत

By admin | Updated: July 9, 2015 00:27 IST

डिजिटल कौशल्य वाढविणार

माहिती-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपल्या देशाचा २१व्या शतकावर वरचष्मा होऊ लागला आहे. त्याला बळकटी देण्यासह डिजिटल क्रांती सर्वव्यापी बनविण्यासाठी केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शिवाजी विद्यापीठ आपल्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि समाज या घटकांसाठी कसा उपयोग करून घेणार, याबाबत विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (आयक्यूएसी) नूतन संचालक व संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. के. कामत यांच्याशी साधलेला हा थेट संवादप्रश्न : ‘डिजिटल इंडिया’ संकल्पना काय आहे?उत्तर : आपल्या देशाच्या ज्ञानवर्र्धित भविष्याची तयारी करणे ही ‘डिजिटल इंडिया’ची संकल्पना आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून ती राबविण्यात येत आहे. यात डिजिटल साधनसामग्रीचा नागरिकांसाठी होणारा उपयोग, शासन व त्याच्या योजना या डिजिटल माध्यमातून नागरिक केंद्रित करणे, तसेच नागरिकांना डिजिटल स्वायत्तता देणे यांचा समावेश आहे. या अंतर्गत डिजिटल लॉकर, ई-कोर्ट, ई-पोलीस, ई-जेल, आदी योजना डिजिटल इंडियाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.प्रश्न : डिजिटल लॉकरचा नागरिकांना कसा उपयोग होणार आहे?उत्तर : डिजिटल इंडिया संकल्पनेतील डिजिटल लॉकरचा उपक्रम नागरिकांना उपयुक्त ठरणारा आहे. यात आपली महत्त्वाची कागदपत्रे ही डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी आॅनलाईन जागा उपलब्ध होणार आहे. एकदा संबंधित कागदपत्रे स्कॅन करून आपल्या डिजिटल लॉकरमध्ये ठेवल्यास ती कधीही आॅनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध होऊ शकतात. ही संकल्पना केंद्र सरकारने विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.प्रश्न : शिवाजी विद्यापीठाचा या उपक्रमात कसा सहभाग राहणार?उत्तर : विद्यापीठाने समाजोपयोगी उपक्रमांची बांधीलकी जोपासली असून ती यापुढे अधिक व्यापक केली जाईल. यात संगणकशास्त्र विभागाने डिजिटल इंडिया उपक्रमाचा विद्यापीठाच्या प्रत्येक घटकासाठी अधिक सक्षमपणे उपयोग करून घेण्याचे ठरविले आहे. यातील पहिले पाऊल म्हणून प्रत्येक नागरिकाला उपयुक्त ठरणारे डिजिटल लॉकर उघडण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आमच्या विभागात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. विद्यापीठातील सर्व कर्मचारी आणि कोल्हापूरकरांना विनामूल्य सेवा पुरविण्यात येणार आहे. महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची डिजिटल लॉकर उघडण्यात येतील. त्या दृष्टीने महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. विद्यापीठाची अंतर्गत गुणवत्ता वाढविण्यासह सातत्याने माहितीच्या माध्यमातून अद्ययावत होण्यासाठी ‘डिजिटल आयक्यूएसी’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिक्षकांना अध्यापनाचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी ई-क्लासचा विस्तार केला जाईल.प्रश्न : विद्यार्थ्यांसाठी काय केले जाणार?उत्तर : विद्यापीठाच्या कार्यप्रणालीचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी रोजगाराभिमुख आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचा अजेंडा आखला आहे. अनेक विद्यार्थी पदवी, पदव्युतर शिक्षण घेतात; मात्र, त्यांना डिजिटल कौशल्य अवगत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ज्ञान असूनदेखील ते मागे राहतात. त्यामुळे डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना डिजिटल-साक्षर केले जाईल. त्यांच्यातील कौशल्ये विकसित केली जातील. त्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे घेण्यात येतील. त्यांच्यातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊन ती विकसित करण्याची विद्यापीठाची भूमिका राहणार आहे.प्रश्न : रोजगार निर्मितीच्या दृष्टीने काय करण्यात येईल?उत्तर : सध्या व्हॉट्स अ‍ॅप, हाईक, टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियाचा सर्रास संवाद साधण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींकडून वापर केला जातो. डिजिटल इंडिया उपक्रमात सोशल मीडियाला महत्त्व आहे. इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देणे. विविध योजना आॅनलाईन व मोबाईल केंद्रित करण्यासह नागरिकांना डिजिटल स्वायत्तता देण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्रात रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढणार आहे. यात विविध स्वरूपांतील ई-प्रणाली, सॉफ्टवेअर, अ‍ॅप्स विकसित करण्याच्या क्षेत्रात रोजगार संधी वाढणार आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांमधील कौशल्ये विकसित केली जातील, त्यांना तसे प्रशिक्षण देऊन तयार केले जाईल. - संतोष मिठारी