शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

विद्यार्थ्यांनी दाखविली भूतदया, पतंगाच्या दोरीत अडकलेल्या कबुतराची झाली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 2:39 PM

कोल्हापूर येथील विकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शाळेच्या आवारातील उंच झाडावर अडकलेल्या पतंगाच्या दोऱ्यात गुरफटलेल्या कबुतराच्या पिल्लाची सुटका केली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी दाखविली भूतदया, पतंगाच्या दोरीत अडकलेल्या कबुतराची झाली सुटकाविकास विद्यामंदिरमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांचा केला सन्मान

कोल्हापूर : येथील विकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शाळेच्या आवारातील उंच झाडावर अडकलेल्या पतंगाच्या दोऱ्यात गुरफटलेल्या कबुतराच्या पिल्लाची सुटका केली.विकास विद्यामंदिरातील शाळेच्या आवारात असलेल्या उंच झाडावर लटकलेल्या पतंगाच्या दोऱ्यात अन्नाच्या शोधातील कबुतराच्या पिल्लाचा पाय गुरफटल्याने त्याची अवस्था केविलवाणी झाली होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना या कबुतराच्या पिल्लाच्या सुटकेची धडपड लक्षात आली. हे पिल्लू या दोरीतून आपले पाय सोडविण्याची धडपड करीत होते.विद्यार्र्थ्यानी आपल्या शिक्षकांचे लक्ष याकडे वेधले. त्यांनी या पिल्लाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला; पण झाड उंच असल्याने बरेच प्रयत्न करूनही त्याची सुटका करता आली नाही. शिक्षकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दूरध्वनी करून पाचारण केले.

माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ शाळेत दाखल झाले आणि दिवसभर अथक प्रयत्न करून उंच शिडीच्या साहाय्याने या कबुतराची सुटका केली. जखमी झालेल्या या कबुतराच्या पिल्लाला विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातच सावलीत ठेवले. जखमेवर हळद लावून त्याला पाणी पाजले. थोड्या वेळाने या कबुतराच्या पिल्लाने विद्यार्थ्यांनी दिलेला खाऊ खाऊन हळुवारपणे शाळेच्या गॅलरीच्या दिशेने झेप घेतली.मुख्याध्यापिका के. जी. आवळे तसेच तानाजी कवडे, राजेंद्र जाधव, ए. एस. शिकलगार या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या या भूतदयेबद्दल त्यांचे कौतुक केले. कबुतराच्या पिल्लाला वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे उदय शिंदे, युवराज लाड, सतीश यादव आणि संजय माने या जवानांनी तत्काळ घटनास्थळी येऊन कबुतराचा जीव वाचविल्याबद्दल या जवानांचा सन्मान शाळेमार्फत करण्यात आला.

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर