शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विद्यार्थ्याने होस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेत जीवन संपवले, नातेवाइकांचा आरोप; जमावाकडून अकॅडमीची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:29 IST

नातेवाइकांनी सखोल तपासाची मागणी केली

इचलकरंजी : बारावीत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने सुतार मळा येथील भंडारी होस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यश अजित यादव (वय १७, रा. पलूस, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेनंतर नातेवाइकांनी यश याच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली. दरम्यान, तरुणांच्या संतप्त जमावाने श्रद्धा अकॅडमीवर हल्ला चढवला. दगडफेक करत काचा फोडल्या, पोस्टर फाडले. घोषणाबाजी करत ठिय्या मारल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. गावभाग पोलिसांनी तरुणांची समजूत काढत त्यांना पोलिस ठाण्यात नेले.याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पलूस येथील यश यादव हा येथील श्रद्धा अकॅडमीमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. तो सुतार मळा परिसरात असलेल्या भंडारी होस्टेलमध्ये राहण्यास होता. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे यश हा आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला होता. परंतु बराच वेळ झाला तरी तो बाथरूममधून बाहेर आला नाही. काहीजणांनी बाथरूमच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता यश याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने बाथरूमचा दरवाजा तोडून यश याला बाहेर काढत जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात नेले. तेथून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात हलविले. त्याठिकाणी उपचारापूर्वीच यश याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर यश याचे नातेवाईक तातडीने इचलकरंजीत दाखल झाले. रुग्णालय आणि होस्टेलमधून माहिती घेत त्यांनी यश याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. यश याचे शवविच्छेदन इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे न करता कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात करण्याची मागणी केली. त्यानुसार यश याचा मृतदेह सीपीआर रुग्णालयाकडे पाठविला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यश याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, खाजगी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या वर्दीवरुन गावभाग पोलिस ठाण्यात मृत अशी नोंद केली आहे.दुपारनंतर तरुणांच्या संतप्त जमावाने सुतार मळ्यातील श्रद्धा अकॅडमीवर हल्ला चढवत काचा फोडत पोस्टर फाडले. याबाबत माहिती समजताच गावभागचे पोलिस दाखल झाले. यावेळी अकॅडमीबाबत संतप्त भावना व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. संबंधित विद्यार्थ्याला न्याय द्या, अशी मागणी केली. आंदोलकांनी ठिय्या मारल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांना गावभाग पोलिस ठाण्यात नेले.

नातेवाइकांनी व्यक्त केला संशयनातेवाइकांनी घेतलेल्या माहितीवरून यश याने होस्टेलच्या बाथरूममध्ये गळ्यातील टॉयने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे शक्य वाटत नाही. त्यामुळे त्याचे शवविच्छेदनदेखील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाऐवजी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात करण्याची मागणी केली. त्यानुसार यश याचे पार्थिव सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले.