पक्ष्यांच्या माध्यमातून मानवी भावनांची मांडणी - चित्कला कुलकर्णी : वि. स. खांडेकर व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:23 IST2021-01-22T04:23:01+5:302021-01-22T04:23:01+5:30
कोल्हापूर : संतांनी आपल्या वाड्मयात निसर्ग आणि पक्ष्यांच्या माध्यमातून मानवी भावभावनांचे कांगोरे टिपले आहेत. या पक्ष्यांनी रचनांचे सौंदर्य अधिक ...

पक्ष्यांच्या माध्यमातून मानवी भावनांची मांडणी - चित्कला कुलकर्णी : वि. स. खांडेकर व्याख्यानमाला
कोल्हापूर : संतांनी आपल्या वाड्मयात निसर्ग आणि पक्ष्यांच्या माध्यमातून मानवी भावभावनांचे कांगोरे टिपले आहेत. या पक्ष्यांनी रचनांचे सौंदर्य अधिक वाढवले आहेच तसेच त्यांच्या जगण्याचे संदर्भ मानवाशी निगडीत आहेत, असे प्रतिपादन चित्कला कुलकर्णी यांनी गुरुवारी केले.
करवीर नगर वाचन मंदिरच्यावतीने आयोजित वि. स. खांडेकर व्याख्यानमालेच्या समारोपात त्यांनी संत वाड्यमयातील पक्षी या विषयावर विचारपुष्प गुंफले. यावेळी ज्येष्ठ गायक विनोद डिग्रजकर, सचिन कुलकर्णी, डॉ. अमर आडके उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाल्या, संतांनी आपल्या वाड्यमयात पक्षी, निसर्ग, मनुष्य यांची सांगड घातली आहे. त्यांच्या रचनांमध्ये चकोर, हिंगडा, मोर, पोपट, सुगरण, कावळा, कोकिळा अशा पक्ष्यांचा उल्लेख येतो. संत तुकाराम यांचे मोरावर दोन अभंग आहेत. चकोरावर ९ तर चातकावर ८ अभंग आहेत. कावळ्यावर सर्वाधिक १२ अभंग आहेत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत पक्ष्यांच्या माध्यमातून भक्तीरस सांगितला आहे. कावळ्याच्या प्रवृत्तीवर संतांनी भाष्य केले असून, त्याला मानवी भावनांचीही जोड दिली आहे. मनुष्यप्राण्याचे वागणेही अनेकदा कावळ्याप्रमाणे असते. कोकिळेचा आवाज ऐकला की, पावसाळ्याची आठवण येते, कावळा ओरडला की घरात पाहुणे येतात, असं म्हणतात. अशा पक्ष्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा संदर्भ मानवी जगण्याशीही आहे.
ग्रंथपाल मनिषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले तर आशुतोष देशपांडे यांनी आभार मानले.
--
फोटो नं २१०१२०२१-कोल-चित्कला कुलकर्णी
ओळ : करवीर नगर वाचन मंदिरच्यावतीने आयोजित वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत गुरुवारी चित्कला कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--