शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 7:08 PM

कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला. प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने कर्मचारी संप मागे घेत असल्याची माहिती एसटी कर्मचारी उत्तम पाटील यांनी दिली.

कोल्हापूर : एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसाहून अधिक दिवस संप करत असलेल्या कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला. प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने कर्मचारी संप मागे घेत असल्याची माहिती एसटी कर्मचारी उत्तम पाटील यांनी दिली.यावेळी, कोल्हापूर आगारातील ५८ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई रद्द केल्याचे पत्र व्यवस्थापक रोहन पलंगे यांनी आंदोलनस्थळी येऊन दिले. त्यांनी ही सेवा पूर्ववत सुरू करून आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले.दरम्यान आज सकाळपासून कोल्हापूर आगारातून एसटीच्या एकूण २० फेऱ्या झाल्या. सकाळी साडे नऊच्या सुमारास कोल्हापूर ते इचलकरंजी अशी पहिली एसटी धावली.

आज झालेल्या एसटीच्या फेऱ्या

इचलकरंजी आगार मार्ग - इचलकरंजी ते कोल्हापूर  ०२ फेऱ्याकागल आगार मार्ग - कागल ते पुणे  ०२ फेऱ्याकोल्हापूर आगार मार्ग  - कोल्हापूर-स्वारगेट (खासगी शिवशाही)  ०२  फेऱ्या  कोल्हापूर-सांगली -  १ फेरी .कोल्हापूर -इचलकरंजी - १ फेरीचंदगड आगार मार्ग - चंदगड - शिनोळी  ०४ फेऱ्याचंदगड हलकर्णी  -  ०१ फेरीहलकर्णी  शिनोळी  - ०१ फेरीचंदगड- पाटणे फाटा   - ०१ फेरीएकूण - २०  फेऱ्या जोपर्यंत एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम होते. काल, मध्यवर्ती बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी तशी शपथ देखील घेतली. मात्र, सरकारने योग्य तोडगा काढल्याने मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन मागे घेत असल्याचे आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले. त्यानंतर आंदोलक कर्मचाऱ्यांमध्ये काहीकाळ अस्वस्थता निर्माण झाली. यातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवारपासून कामावर हजर राहावे, अन्यथा बडतर्फीच्या कारवाईस सामोरे जावे, असा इशारा दिला. यामुळे बडतर्फीच्या भितीपोटी काही कर्मचारी कामावर हजर देखील झाले होते. अखेर बऱ्यास दिवसानंतर पुन्हा लालपरीची चाके गतीमान होवू लागली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर