शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

हॉट स्पॉट गावांत नियमांची कडक अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 10:41 IST

CoronaVIrus In Kolhpaur : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे दिसत आहे, याची शास्त्रोक्त कारणे शोधून त्यातील त्रुटी दूर करा, हॉट स्पॉट गावांत नियमांची कडक अंमलबजावणी करा, गृह विलगीकरण कमी करा व रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.

ठळक मुद्देहॉट स्पॉट गावांत नियमांची कडक अंमलबजावणी करापालकमंत्री सतेज पाटील यांच्या कोरोना आढावा बैठकीत सूचना

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे दिसत आहे, याची शास्त्रोक्त कारणे शोधून त्यातील त्रुटी दूर करा, हॉट स्पॉट गावांत नियमांची कडक अंमलबजावणी करा, गृह विलगीकरण कमी करा व रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण दर, मृत्यू दर, वैद्यकीय उपचार सेवा-सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असून याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या गावांमधील संसर्ग नियंत्रणासाठी यंत्रणेने अधिक प्रयत्न करावेत.

हॉट स्पॉट गावांमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करा. गृह विलगीकरण प्रभावीपणे होतेय का, यावर लक्ष ठेवा. गृह विलगीकरणातील रुग्ण, बाधित तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या, उपलब्ध खाटा ही माहिती ऑनलाईन पद्धतीने अद्ययावत करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रभारी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर