शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पट्टणकोडोलीत उमेदवारीसाठी ताकद पणास

By admin | Updated: January 3, 2017 01:12 IST

उमेदवारी देताना गटबाजीही ठरणार डोकेदुखी : अद्याप कोणत्याही पक्षाने आघाडीबाबत धोरण स्पष्ट न केल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था

इरफान मुजावर --पट्टणकोडोली --आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पट्टणकोडोली मतदारसंघ ओबीसी महिला आणि पट्टणकोडोली व रुई पंचायत समिती ओबीसी पुरुष जागेसाठी राखीव झाला आहे. सद्य:स्थितीत बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे कोणत्याच पक्षाला मतदारसंघावर आपली दावेदारी सांगता येणार नाही. मात्र, अद्यापही कोणत्याही पक्षाने आघाडीबाबत धोरण स्पष्ट न केल्याने व पक्षांतर्गत गटबाजीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी आपली ताकद पणाला लावली असली तरीही उमेदवारीबाबत अस्पष्टताच आहे.पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ हातकणंगले तालुक्यातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. यामध्ये पट्टणकोडोली, रुई, माणगाव व माणगाववाडी या गावांचा समावेश होतो. मतदारसंघावर सुरुवातीपासून जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे वर्चस्व होते, तर पंचायत समितीसाठी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दावेदारी होती. सन २००७ साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे कुमार खूळ, पट्टणकोडोली पंचायत समितीसाठी शिवसेनेचे साताप्पा भवान व रुई पंचायत समितीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अरुण मगदूम निवडून आले होते. २०१२ च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच पट्टणकोडोलीतील सामाजिक वातावरण ढवळून निघाले. याचा फायदा मतदारसंघात नावापुरत्या असणाऱ्या राष्ट्रवादीला झाला. यातूनच काँग्र्रेस, शिवसेनेच्या वर्चस्वाला पूर्णविराम देत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेसह दोन्ही पंचायत समितींवर झेंडा फडकविला. यावेळी जिल्हा परिषदेसाठी धैर्यशील माने आणि पंचायत समितीसाठी प्रभावती पाटील व शीतल यादव निवडून आल्याने काँग्रेस व शिवसेनेची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे २०१२ नंतर मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे.आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पट्टणकोडोली मतदारसंघ ओबीसी महिला जागेसाठी राखीव झाला आहे. मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व असले तरी आवाडे-आवळे यांच्यातील वादामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी आवाडे देणार की, आवळे देणार यावर प्रश्नचिन्ह आहे. जवाहर साखर कारखान्यामुळे मतदारसंघात आवाडे गटाचे अस्तित्व असल्याने गटाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. तर हा मतदारसंघ माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्याकडे आहे. पट्टणकोडोलीत पंचायत समितीसाठी शिवसेना मजबूत आहे. यापूर्वी शिवसेना स्वबळावर लढत आली आहे. मात्र, या निवडणुकीसाठी योग्य जागा वाटप होत असेल, तर शिवसेना हातकणंगले तालुक्यात भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत आहे. माणगाव व माणगाववाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गोळाबेरीज मोठ्या प्रमाणात आहे. मतदारसंघातील सर्वच गावांत भाजपमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष वाढीस मदत झाली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने मतदारसंघ काबीज केला असला, तरी विकासाच्या कारणावरून ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर आहे. ताराराणी आघाडीही होण्याची शक्यता आहे. जनसुराज्य, रासप व आरपीआयची गोळाबेरीज विजयासाठी जमेत धरावी लागणार आहे. या सर्व परिस्थितीमुळे कोणताही पक्ष मतदारसंघावर थेट आपली दावेदारी सांगू शकत नाही. मात्र, अद्यापही कोणत्याही पक्षाची आघाडीबाबतची धोरणे स्पष्ट झालेली नाहीत. तसेच पक्षातील गटबाजीही उमेदवारी देताना डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे ओबीसी दाखले उपलब्ध असणाऱ्या इच्छुकांनी पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. उमेदवारी वाटपानंतर बंडखोरीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे.पंचायत समिती काँग्रेस (आवाडे गट) - संतोष शेळकेकाँग्रेस (आवळे गट) - पोपट ओमापुजारी, सतीश पुजारीभाजप - परशराम डावरे, संदीप माळी, शिरीष शिरगुप्पे शिवसेना - अरुण माळी, मुरारी ढबू, शिवानंद स्वामी, लक्ष्मण पुजारी, राजू कोळी राष्ट्रवादी (माने गट) - वसंत बोंगाळे, खाना अवघडे इतर - प्रमोद बोरगावे, संदीप फगरे, रायगोंडा डावरे पंचायत समिती - रुईअजीम मुजावर, दिलीप साळुंखे आणि झाकीर भालदार (राष्ट्रवादी / माने गट)२०१२ मतदारसंघात झालेली लढतपट्टणकोडोली जिल्हा परिषद १) धैयर्शील संभाजीराव माने (राष्ट्रवादी)- १०६९७२) शिरीष आण्णासो देसाई (कॉंग्रेस)- ५८७२३) अरुण नाभीराज मगदूम (शेतकरी संघटना)- ४२१९पट्टणकोडोली पंचायत समिती १) प्रभावती राजगोंडा पाटील (राष्ट्रवादी)- २९१४२) संगीता बाळासो कागले (अपक्ष) - २३८८३) संगीता गोरखनाथ माळी (शिवसेना)- १५०१रुई पंचायत समिती१) शीतल जितेंद्र यादव (राष्ट्रवादी) - ४५७५२) रेखा जयसिंग कांबळे (आवळे गट) - ३७१९३) मनीषा दीपक गवळी (आवाडे गट) - २४८४इच्छुक उमेदवारजिल्हा परिषदकाँग्रेस (आवाडे गट)- राणी बिरू धनगर, वंदना मगदूम भाजप - अंजली धीरज भोजकर, आरिफा आदम शिकलगार, वैशाली आडकेशिवसेना - सुधा स्वामीराष्ट्रवादी (माने गट) - स्मिता महेश नाझरे, शीतल प्रकाश बोंगाळे