कुंभार समाजाला नाहक त्रास देणे बंद करा : मारुतराव कातवरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:47+5:302021-02-05T07:07:47+5:30
कुंभारवाडी येथे संत गोरोबाकाका कुंभार समाजमंदिरात शासनाच्या जाचक अटींविरोधात जनजागृतीसाठी कुंभार समाज मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ...

कुंभार समाजाला नाहक त्रास देणे बंद करा : मारुतराव कातवरे
कुंभारवाडी येथे संत गोरोबाकाका कुंभार समाजमंदिरात शासनाच्या जाचक अटींविरोधात जनजागृतीसाठी कुंभार समाज मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बळवंत कुंभार होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, यापूर्वी कुंभार समाजाने रॉयल्टी विरोधात १९९७ साली मुंबई येथे धडक देऊन मडकी फोड आंदाेलन केले हाेते. या आंदोलनानंतर कुंभार समाजाला रॉयल्टी पूर्णत: माफ करण्यात आली असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, आमच्या व्यवसायातून फक्त ०.५ टक्के प्रदूषण होत असताना आमच्याकडे बोट दाखवता, त्याचवेळी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणाऱ्या उद्योग का बंद केले जाते नाहीत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. संदीप कुंभार यांनी स्वागत केले, तर रामचंद्र चौगुले यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा हेतू विशद केला. उत्तम कुंभार,कुंभार समाज कृती समितीचे अध्यक्ष बबन वडणगेकर, तानाजी कुंभार, दीपक कुंभार यांनी मनोगत व्यक्त केली.
या मेळाव्यासाठी सरपंच स्वप्नाली कुंभार, उपसरपंच ईश्वरा कुंभार, पोलीसपाटील बळवंत कुंभार, ग्रामसेवक दीपक कुंभार, माजी सरपंच तानाजी कुंभार, बापु कुंभार, गोरखनाथ कुंभार, प्रशांत कुंभार, बाजीराव कुंभार, सात्तापा कुंभार उपस्थित होते.
---------------------------------------------------------------
फोटो ओळी - कुंभारवाडी (ता. राधानगरी) येथे कुंभार समाजाच्या मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना मारुतराव कातवरे.व्यासपीठावर उत्तम कुंभार, बबन वडणगेकर ,बापू कुंभार, बळवंत कुंभार आदी.