शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ यांची बदनामी थांबवा, अन्यथा जशास तसे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपला पोटशूळ उठला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपला पोटशूळ उठला आहे. त्यातूनच ते रोज एका मंत्र्यावर आरोप करत सुटले असून, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर या द्वेषातूनच किरीट सोमय्यांनी आरोप केले आहेत, त्याचा निषेध करतो. राजकारणातील ३०-४० वर्षे सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्यावर सवंग लोकप्रियता व भाजप प्रदेशाध्यक्षांना बरे वाटावे म्हणून कोणी बदनामी करत असेल, तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, बाजार समितीचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील व जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील, संचालक आर. के. पोवार यांनी दिला.

कागलच्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली उभी हयात घालवली. पक्ष देईल त्या खात्याचा वापर सामान्य माणसासाठी कसा करता येईल, हेच त्यांनी आतापर्यंत पाहिले. कागल, उत्तूर परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य देण्यासाठी त्यांनी संताजी घोरपडे कारखान्याची उभारणी केली. हजारो शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे या कारखान्याच्या उभारणीत आहेत. मात्र, सत्ता गेल्याने सैरभैर झालेल्या काही मंडळींनी किरीट सोमय्या यांचे कान भरून आरोप करायला लावले. यातून काहीही निष्पन्न होणार नाही, हे निश्चित आहे.

ग्रामविकास विभागाच्यावतीने त्यांनी गेल्या दीड वर्षात गावे, वाड्या-वस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे. अशा कर्तबगार व जनतेची कणव असणाऱ्या नेत्यावर कोणी चिखलफेक करीत असेल, तर कोल्हापूरची जनता कदापी सहन करणार नसल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.