शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

मतांच्या पिकासाठी पाणी सोडल्याने साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:43 IST

शिल्लक पाण्यासह पावसाळ्याला सामोरे जाणारी जिल्ह्णातील धरणे यंदा मात्र पावसाळा सुरू होण्याआधीच कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या वारणा धरणात आठ टीएमसी पाणी शिल्लक राहत असताना यावर्षी सर्व लहान-मोठी ६७ धरणे मिळून केवळ सात टीएमसी पाणी शिल्लक आहे. धरणे मोकळी होण्यास कडक उन्हाळा, पाण्याची वाढलेली गरज,

ठळक मुद्देलोकसभेचा परिणाम : चार मोठ्या धरणांत पाच टक्केच पाणी कोल्हापूर जिल्ह्यात केवळ आठ टक्के पाणीसाठा

नसिम सनदी ।कोल्हापूर : शिल्लक पाण्यासह पावसाळ्याला सामोरे जाणारी जिल्ह्णातील धरणे यंदा मात्र पावसाळा सुरू होण्याआधीच कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या वारणा धरणात आठ टीएमसी पाणी शिल्लक राहत असताना यावर्षी सर्व लहान-मोठी ६७ धरणे मिळून केवळ सात टीएमसी पाणी शिल्लक आहे. धरणे मोकळी होण्यास कडक उन्हाळा, पाण्याची वाढलेली गरज, सिंचनाचे वाढीव क्षेत्र आणि बाष्पीभवन ही कारणे सांगितली जात असली तरी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून सोडलेल्या पाण्यामुळे ही स्थिती उदभवली आहे. एप्रिल महिन्यात नदी दुथडी भरून राहू दे, म्हणून लोकप्रतिनिधींनीच आग्रह धरल्याने पाटबंधारे खात्याने जलविसर्गात हात सैल सोडला. परिणामी आज धरणांनी पहिल्यांदाच तळ गाठला असून, मान्सून लवकर सुुरु झाला नाही तर जिल्ह्णाला पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार आहे.

राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी या चार मोठ्या धरणांत तर अवघा पाच टक्केच पाणीसाठा उरला आहे. आठवडाभरात तब्बल दोन टीएमसीने कमी होऊन तो ७.०७ टीएमसीवर आला आहे. मागील आठवड्यात तो ९.६७ टक्के होता. उपलब्ध पाणी या महिनाअखेरपर्यंत पुरेल असा पाटबंधारेचा दावा असला तरी वेगाने घट होत असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत; तथापि मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने सिंचनावरील भार हलका झाल्याने काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे. जिल्ह्णात चार मोठी, नऊ मध्यम आणि ५४ लघुपाटबंधारे प्रकल्पांची क्षमता ८७.५४ टीमएसी असली तरी आॅक्टोबर २०१८ अखेर प्रत्यक्षात ८४.६१ टीमएसी पाणीसाठा या धरणांमध्ये होता. ७८ टीएमसी पाण्याचा आतापर्यंत धरणातून विसर्ग झाला असून तो सिंचन, औद्योगिक आणि पिण्यासाठी वापरले गेले आहे. ‘वारणे’चे कृष्णेतून म्हैसाळला नऊ, तर दूधगंगेतून कर्नाटकला १५ टीएमसी पाणी देण्याचा करार आहे. ‘राधानगरी’चे पाणी कोल्हापूर शहराला सहा व इचलकरंजी शहरासाठी सहा याप्रमाणे १२ टीएमसी देण्याचे पूर्वीपासूनचेच धोरण आहे. त्याप्रमाणेच विसर्ग करण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. तथापि यावर्षी पाणीविसर्गाच्या वेळापत्रकावर लोकसभा निवडणुकीचा प्रभाव राहिल्याने लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे मार्च ते एप्रिल या महिन्यात धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी पाणीटंचाईची झळ लोकांना बसू नये म्हणून लोकप्रतिनिधीने नद्या दुथडी भरून कशा वाहतील याची दक्षता घेतली. धरणांतून विसर्ग कमी करू नये, अशी पत्रेच प्रत्येक लोकप्रतिनिधीने पाटबंधारे विभागाकडे पाठविली. परिणामी एप्रिल महिन्यात रोटेशन नसतानाही पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करावा लागला. मान्सून लांबणार असल्याचा अंदाज वर्तविला तरी यात सुधारणा झाली नाही. परिणामी धरणांनी वेगाने तळ गाठण्यास सुरुवात केली. आता हेच लोकप्रतिनिधी ‘पाणी सोडा’ म्हणून ‘पाटबंधारे’कडे आग्रह धरत आहेत. वारणा धरणातून नऊ टीएमसी पाणी म्हैसाळ योजनेला देण्याचा करार आहे; पण यावर्षी १३ टीएमसीपेक्षाही जास्त पाणी वारणेतून सोडण्यात आले. दूधगंगा धरणातून कर्नाटकला सहा टीमएसी पाणी सोडले जाते. यावर्षी ते आतापर्यंत सात टीमएसी सोडण्यात आले आहे.

करारापेक्षा जास्त पाणी दिले गेल्याने नागरिकांवर मात्र उपसाबंदीला सामोरे जावे लागले आहे. दूधगंगेतून वेदगंगेला सोडण्यात येणारे पाणी बंद केल्याने शेती संकटात आली आहे. वारणा खोºयातही उपसाबंदी लागू करून शेतीसाठी पाणी उचलण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वारणेत गेल्या वर्षी आजच्या घडीला ७.४० टीमएसी पाणी शिल्लक होते, ते आता केवळ १.४५ टक्के इतक्या नीचांकावर आले आहे. दूधगंगेची परिस्थितीही तशीच आहे. आज केवळ ०.४१ टक्के साठा शिल्लक आहे. गतवर्षी तो ४.९८ टक्के होता. आठवडाभरात ०.८८ वरून ०.४१ टक्के इतका निम्म्याने कमी झाला असून केवळ दोन टक्के साठा आहे.१२ टीएमसी पाण्याची तूटलोकप्रतिनिधींच्या दबावामुळे विसर्ग वाढवविल्याचा फटका धरणातील साठ्यावर झाला असला तरी परतीचा पाऊस, वळीव आणि बाष्पीभवनही तुटीला कारणीभूत ठरले आहे. आॅक्टोबरपासून परतीचा पाऊस न झाल्याने तीन, वळीव न झाल्याने पाच आणि बाष्पीभवनामुळे चार अशी एकूण १२ टीएमसी पाण्याची तूट झाली आहे. त्यामुळेही धरणातील साठा कमी झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात केवळ आठ टक्के पाणीसाठाजिल्ह्यात राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा या चार मोठ्या धरणांमध्ये आजच्या घडीला केवळ ३.३४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मागील आठवड्यात हे प्रमाण ४.५२ टीएमसी इतके होते. आठवडाभरात १.१८ टीएमसी पाणी संपले आहे. हीच परिस्थिती कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे या नऊ मध्यम प्रकल्पांची आहे. येथेही केवळ ३.७३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मागील आठवड्यात हे प्रमाण ३.९९ टक्के होते. ५४ लघू प्रकल्पातील साठाही एक टीएमसीपर्यंत खाली आला आहे.

धरणांतील पाणीसाठाधरण साठा टक्केवारीतुळशी ०.७४ २३राधानगरी ०.७४ १०वारणा १.४५ ०५दूधगंगा ०.४१ ०२कासारी ०.३६ १३कडवी ०.८७ ३५कुंभी ०.६१ २३पाटगाव ०.६२ १७चिकोत्रा ०.४० २६चित्री ०.२४ १३जंमगहट्टी ०.१२ १०घटप्रभा ०.४७ ३०जांबरे ०.०२ ०२कोदे ०.०२ ११

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर