शिरोळच्या उपनगराध्यक्षाकडे सापडला सुगंधी तंबाखूचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:26 IST2021-05-11T04:26:03+5:302021-05-11T04:26:03+5:30
शिरोळ : येथील उपनगराध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय माने (वय ५०, रा. जयहिंदनगर) यांच्या घरातच साडेतीन लाख रुपयांचा सुगंधी तंबाखूचा साठा ...

शिरोळच्या उपनगराध्यक्षाकडे सापडला सुगंधी तंबाखूचा साठा
शिरोळ : येथील उपनगराध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय माने (वय ५०, रा. जयहिंदनगर) यांच्या घरातच साडेतीन लाख रुपयांचा सुगंधी तंबाखूचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता शिरोळ पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी सांगितले की, जयहिंद नगर येथे सुगंधी तंबाखूचा साठा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपनगराध्यक्ष राजेंद्र माने राहत असलेल्या घरामध्ये पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सुगंधी तंबाखूचा साठा मिळून आला. ३ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. शासनाने सुगंधी तंबाखूवर बंदी घातली असतानाही संशयीताने याचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयीत माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सुळ करीत आहेत.
फोटो - १००५२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ येथे उपनगराध्यक्ष राजेंद्र माने यांच्या घरामध्ये सापडलेला सुगंधी तंबाखू साठा पोलिसांनी जप्त केला.