अजूनही एकला चलोरेच; राजू शेट्टी यांनी जाहीर केली भूमिका

By भीमगोंड देसाई | Updated: August 24, 2023 20:30 IST2023-08-24T20:10:30+5:302023-08-24T20:30:58+5:30

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Still alone; Raju Shetty portrayed the role | अजूनही एकला चलोरेच; राजू शेट्टी यांनी जाहीर केली भूमिका

अजूनही एकला चलोरेच; राजू शेट्टी यांनी जाहीर केली भूमिका

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून निमंत्रण मिळाले आहे. आम्ही स्थापन केलेल्या प्रागतिक विकास मंचमधील काही पक्ष महाविकास आघाडीसोबत आहेत. यामुळे इंडिया आघाडीसोबत आम्ही जावे असे, काही पक्ष, संघटनांना वाटत आहे. पण अजून आमचा निर्णय झालेला नाही. एकला चलोरेचीच तूर्त भूमिका आहे. मात्र सर्वच पिकांना किमान हमीभावाची हमी देण्याऱ्या पक्षाचा विचार करू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरूवारी स्पष्ट केले.

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ते कोणासोबत जावून की स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात राहणार याबद्दल प्रचंड उत्सूकता निर्माण झाली आहे. मात्र त्यांनी सध्या तरी एकला चलोरेचीच भूमिका घेतली आहे.

Web Title: Still alone; Raju Shetty portrayed the role