कारागृहाच्या महिला सुरक्षारक्षकेच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 16:45 IST2019-02-25T16:44:37+5:302019-02-25T16:45:37+5:30

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या महिला सुरक्षारक्षकेच्या बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ६० हजार रोकड, सोन्याच्या दोन रिंगा, चांदीचा करंडा, दोन छल्ले असा सुमारे ७० हजार किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे रविवारी उघडकीस आले.

Stealing the house of the prisoner's security guard | कारागृहाच्या महिला सुरक्षारक्षकेच्या घरी चोरी

कारागृहाच्या महिला सुरक्षारक्षकेच्या घरी चोरी

ठळक मुद्देकारागृहाच्या महिला सुरक्षारक्षकेच्या घरी चोरीजुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या महिला सुरक्षारक्षकेच्या बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ६० हजार रोकड, सोन्याच्या दोन रिंगा, चांदीचा करंडा, दोन छल्ले असा सुमारे ७० हजार किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे रविवारी उघडकीस आले.

अधिक माहिती अशी, कारागृहा संगिता दत्तात्रय चव्हाण (वय ४३) यांचे कारागृहाच्या समोरच्या वसाहतीमध्ये घर आहे. त्या कामानिमित्त गावी गेल्या होत्या. त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी ऐजव लंपास केला.

त्यांनी याबाबत जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कारागृह वसाहतीमध्ये यापूर्वीही अनेक घरफोड्या झाल्या आहेत. येथील निवास्थाने असुरक्षीत बनली आहेत.
 

 

Web Title: Stealing the house of the prisoner's security guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.