महिन्याभरात राज्याचे नवे उद्योग धोरण :  सुभाष देसाई यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 18:01 IST2018-10-06T17:59:45+5:302018-10-06T18:01:32+5:30

राज्याचे नवे उद्योग धोरण येत्या महिनाभरात तयार होणार आहे. उद्योग मंत्रालयाने मुख्यमंत्र्याकडे यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

State's new industry policy this month: Information about Subhash Desai | महिन्याभरात राज्याचे नवे उद्योग धोरण :  सुभाष देसाई यांची माहिती

महिन्याभरात राज्याचे नवे उद्योग धोरण :  सुभाष देसाई यांची माहिती

ठळक मुद्देमहिन्याभरात राज्याचे नवे उद्योग धोरण :  सुभाष देसाई यांची माहितीकोल्हापूरसह छोट्या शहरांच्या उद्योग विस्ताराला उपयुक्त धोरण

कोल्हापूर: राज्याचे नवे उद्योग धोरण येत्या महिनाभरात तयार होणार आहे. उद्योग मंत्रालयाने मुख्यमंत्र्याकडे यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

नव्या धोरणात वीजेचे दर राज्यात सर्वत्र समान व इतर राज्याच्या तुलनेत कमी असावेत असा आग्रह धरण्यात आला आहे. कोल्हापूरसारख्या छोट्या शहरांच्या उद्योग विस्ताराला या धोरणात झुकते माप असणार आहे. पारदर्शक व सकारात्मकतेवर अधिकचा भर असणार आहे. 

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात आले असता उद्योगमंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार प्रकाश आबीटकर यांची उपस्थिती होती.

 

Web Title: State's new industry policy this month: Information about Subhash Desai