अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST2021-04-06T04:23:58+5:302021-04-06T04:23:58+5:30
कोल्हापूर अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियच्यावतीने महिला आणि बालकल्याण ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निवेदन
कोल्हापूर अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियच्यावतीने महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांची सोमवारी भेट घेण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये जाहीर केलेली मानधन वाढ करावी, सेवासमाप्तीनंतरचे लाभ द्यावेत, तीन वर्षांपासून प्रवासभत्ते दिलेले नाहीत, ते अदा करावेत, मोबाइलवरून काम करताना तो नादुरुस्त झाल्यास, हरवल्यास, चोरीला गेल्यास त्याची नुकसान भरपाई शासनाने मागू नये, याबाबत सेविकेकडून घेण्यात आलेले हमीपत्र रद्द करावे,मोबाइलवर ज्यांना काम जमत नाही त्यांना दबाव आणू नये अशा विविध मागण्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पोषण ट्रॅकरबाबतीत असणाऱ्या विविध अडचणींबाबतही यावेळी उहापोह करण्यात आला.
जयश्री पाटील, आप्पा पाटील, अर्चना पाटील, अनिता माने, प्रवीण अंबले, अश्विनी सुर्वे, जमिरा शेख, वर्षा शिरोलीकर, स्वाती जाधव यावेळी उपस्थित होत्या.