शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर महावितरण कार्यालयाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:22 IST

मलकापूर : टेकोली (ता. शाहुवाडी) येथील नळपाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शाखा शाहुवाडी यांच्यातर्फे ...

मलकापूर : टेकोली (ता. शाहुवाडी) येथील नळपाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शाखा शाहुवाडी यांच्यातर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरण कार्यालयावर गावातील महिलांनी निदर्शने केली. या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांनी केले.

टेकोली येथील ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी महावितरण कंपनीने बंद केल्याने ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांसह महिलांनी डोक्यावर घागर घेऊन निदर्शने केली. यावेळी महावितरण कार्यालयाविरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी युवराज काटकर म्हणाले की, अशा पद्धतीने कारवाई करणे चुकीचे असून, याबाबत महावितरणचे योग्य तो निर्णय घ्यावा व संबंधित गावातील पिण्याच्या पाण्याची सोय करावी. यावेळी उपकार्यकारी अभियंता श्याम राज यांना ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सरपंच सुरेखा जाधव, उपसरपंच शौकत हवलदार, संजय जाधव, सतीश तांदळे, रोहित जांभळे, संदीप कांबळे, अजय गुरव, प्रवीण कांबळे, सिद्धार्थ लोखंडे आदींसह गावातील महिला उपस्थित होत्या.