शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा : कोल्हापूरसह नागपूर, औरंगाबाद, आदींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 12:24 PM

कोल्हापुरातील शाहू स्टेडियम व शिवाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या १७ वर्षांखालील मुली व १९ वर्षांखालील मुले राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या दोन्ही संघांसह नागपूर, औरंगाबाद, क्रीडा प्रबोधिनी, मुंबई, पुणे या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आगेकूच केली. 

ठळक मुद्देराज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा : कोल्हापूरसह नागपूर, औरंगाबाद, आदींची बाजी१७ वर्षांखालील मुली, १९ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत अटीतटीची लढत

कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहू स्टेडियम व शिवाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या १७ वर्षांखालील मुली व १९ वर्षांखालील मुले राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या दोन्ही संघांसह नागपूर, औरंगाबाद, क्रीडा प्रबोधिनी, मुंबई, पुणे या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आगेकूच केली. उद्घाटनाच्या १७ वर्षांखालील मुलींच्या पहिल्या सामन्यात कोल्हापूर विभाग (छत्रपती शाहू विद्यालय)ने मुंबई विभाग (बॉम्बे स्कॉटिश, माहीम) चा ४-१ असा पराभव केला. कोल्हापूरकडून निहारिक पाटील हिने तीन गोल करीत स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक केली; तर तिला सनातुबी हिने एक गोल करीत मोलाची साथ दिली. मुंबईकडून प्रणिता निमकर हिने एकमेव गोल केला.

दुसऱ्या सामन्यात नागपूर विभाग (प्रागतिक माध्यमिक व उच्च माध्यमिक, कोराडी, ता. कामठी) संघाने लातूर विभाग (बंकटलाल लाहोटी इंग्लिश मीडियम स्कूलचा ७-० असा एकतर्फी पराभव केला. नागपूरकडून इशा सिलारे हिने ३, आयुषी सूर्यवंशी हिने दोन, तर सेजल सोनारे व रक्षदा सोनेकर हिने प्रत्येकी एक गोल केला.

तिसऱ्या सामन्यात औरंगाबाद विभाग (पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आष्टा) या संघाने नाशिक विभाग (सेंट झेव्हिअर्स स्कूल, नाशिक)चा टायब्रकेरवर ४-२ असा पराभव केला. चौथ्या सामन्यात पुणे विभाग (प्रवरा कन्या विद्यामंदिर, लोणी) संघाने क्रीडा प्रबोधिनी संघाचा १-० असा निसटता पराभव केला. ‘पुणे’कडून विजयी गोल स्नेहल कळमळकर हिने नोंदविला.

कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे राज्यस्तरीय १७ व १९ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर शोभा बोंद्रे, मधुरिमाराजे यांच्या उपस्थित झाले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, माणिक मंडलिक उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

१९ वर्षांखालील मुलांमध्ये कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर ) संघाने औरंगाबाद विभाग (मौलाना आझाद विद्यालय) संघाचा ४-० असा एकतर्फी पराभव केला. कोल्हापूरकडून दिग्विजय आसनेकरने दोन, तर प्रणव कणसे व ओंकार बेळगूडकर यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली.

दुसऱ्या सामन्यात नागपूर विभाग (हिस्लोप कॉलेज)ने नाशिक विभाग (भोसला मिलिटरी कॉलेज) संघाचा टायब्रेकरवर ५-४ असा निसटता पराभव केला. या सामन्यांत एकूण वेळेत २-२ अशी अटीतटीची लढत झाली. नागपूर संघाकडून बादल सोरेनने, तर नाशिककडून रुतीज अहिरराव यांनी प्रत्येकी दोन गोल केले.

क्रीडापीठ अर्थात क्रीडा प्रबोधिनी (पुणे)ने लातूर विभाग (फैजल उलूम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज)चा ६-० असा एकतर्फी पराभव केला. क्रीडा प्रबोधिनीतर्फे विश्वनाथ शेळके, सतीश हवालदार यांनी प्रत्येकी दोन, तर निहाल डबाले, शिवराज पाटील यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली. दुपारच्या सत्रात कोल्हापूरच्या संघाने अमरावती संघावर २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, अंधुक प्रकाशामुळे हा सामना थांबविण्यात आला.स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर शोभा बोंद्रे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्या मधुरिमाराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उद्योजक चंद्रकांत जाधव, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, उदय पाटील, उदय आतकिरे, एस. एस. मोरे, राजेंद्र दळवी, सुधाकर जमादार, क्रीडाधिकारी बालाजी बरबंडे, विकास माने, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, प्रदीप साळोखे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूरSchoolशाळा