शिंदेवाडीमध्ये आजपासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

By Admin | Updated: January 29, 2015 00:08 IST2015-01-28T23:55:40+5:302015-01-29T00:08:41+5:30

४१ संघ सहभागी: चार सुसज्ज मैदाने

State-level Kabaddi competition in Shindevwadi today | शिंदेवाडीमध्ये आजपासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

शिंदेवाडीमध्ये आजपासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

मुरगूड : महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि शिंदेवाडी (ता. कागल) येथील नवजवान तरुण मंडळाच्यावतीने आयोजित मॅटवरील राज्यस्तरीय कबड्डी सामन्यांचा प्रारंभ उद्या, गुरुवारी होणार आहे. या सामन्यांसाठी राज्यातील पुरुषांचे २० , तर महिलांचे २१ संघ सहभागी झाले आहेत. सर पिराजीराव घाटगे क्रीडा संकुलामध्ये चार सुसज्ज मैदाने तयार असून, दिवसरात्र सामने होणार आहेत. प्रो-कबड्डीच्या धर्तीवर मैदाने आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली आहेत.
उद्या सायंकाळी चार वाजता जिल्हा कबड्डी असोसिएशनचे
अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, तर बिडी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

नामांकित संघांचा सहभाग
या स्पर्धेसाठी राज्यातील पुरुष गटामध्ये अंकुर-मुंबई, विजय बजरंग-मुंबई, ओमसाई-बोरीवली, पंचवटी-घाटकोपर, सतेज-बाणेर, मावजी मंडळ-ठाणे, पंचक्रोषी-सिंधुदुर्ग असे, तर महिला गटामध्ये विश्वशांती-मुंबई, संघर्ष-गोरेगाव, तेजस्विनी-विलेपार्ले, दिलखूश-रायगड, एम. एच. स्पोर्टस्-पुणे, क्षमदान-पुणे, साई-औरंगाबाद, सिद्धी-सोलापूर असे नामांकित संघ सहभागी झाले आहेत.

Web Title: State-level Kabaddi competition in Shindevwadi today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.