कोल्हापूर : राष्ट्रीय सहकार धोरण २०२३ मधील शिफारशींचा अभ्यास करून राज्याच्या दृष्टीने नवीन धोरण आखण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांच्या समितीमध्ये ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय सहकार धोरणामध्ये राज्याच्या दृष्टीने काय नवीन बदल करता येऊ शकतात? याबाबत अभ्यास ही समिती करणार आहे. समितीमध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, रिझर्व्ह बँकेचे सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे, एनसीसीचे संचालक व्ही. व्ही. सुधीर, सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राज्य साखर कारखाना संघाचे संचालक संजय खताळ,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष दिगंबर दुर्गांडे, सेवानिवृत्त सहकार आयुक्त मधुकर चौधरी, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त दिनेश ओऊळकर यांच्यासह राज्याचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, सहकार आयुक्त, वस्त्रोद्योग महामंडळाचे आयुक्त, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्य व्यवसाय विभागाचे आयुक्तांचा यामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्रात सहकार तुलनेत बळकट आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो अधिक बळकट करण्याबरोबरच नवरोजगार निर्मिती कशी निर्माण करता हा समितीचा अभ्यासविषय आहे. - डॉ. चेतन नरके
Web Summary : A 17-member committee, headed by the Cooperation Minister, will formulate a new state cooperative policy based on the National Cooperative Policy 2023. Gokul Milk Union's Dr. Chetan Narke is included. The committee will explore relevant changes for Maharashtra, focusing on strengthening cooperation and creating new employment opportunities.
Web Summary : सहकारिता मंत्री की अध्यक्षता में 17 सदस्यीय समिति राष्ट्रीय सहकारी नीति 2023 के आधार पर एक नई राज्य सहकारी नीति तैयार करेगी। गोकुल दूध संघ के डॉ. चेतन नरके शामिल हैं। समिति महाराष्ट्र के लिए प्रासंगिक परिवर्तनों का पता लगाएगी, सहयोग को मजबूत करने और रोजगार के नए अवसर पैदा करने पर ध्यान केंद्रित करेगी।