कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सोयाबीन खरेदी सुरू करण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकरी सोयाबीनची पोती घेऊन प्रांत कार्यालयावर दाखल झाले असून दोन महिने मागणी करूनही खरेदी केंद्र सुरू न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्य सरकारकडे सोयाबीन खरेदी करण्यास प्रस्ताव दाखल करूनही मान्यता देण्यात आली नसल्याने संतप्त शेतक-यांनी प्रांत कार्यालयावर सोयाबीन पोती विक्री करण्यास आणले आहेत. राज्य सरकारकडे बारदान खरेदी करण्यास पैसे नसल्याने व सोयाबीन खरेदी केल्यानंतर हमीभावाने शेतक-यांना पैसे देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसल्याने खरेदी केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ करत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी केली.
Web Summary : Farmers protested in Kolhapur demanding immediate opening of soybean purchase centers. Despite requests, no action was taken, prompting the 'Swabhimani' organization to stage a protest, bringing soybean sacks to the Gadhinglaj office, criticizing government inaction due to lack of funds.
Web Summary : किसानों ने कोल्हापुर में सोयाबीन खरीद केंद्र तुरंत खोलने की मांग करते हुए विरोध प्रदर्शन किया। अनुरोधों के बावजूद कोई कार्रवाई नहीं हुई, जिससे 'स्वाभिमानी' संगठन ने विरोध प्रदर्शन किया, गडहिंग्लज कार्यालय में सोयाबीन की बोरियाँ लाईं, धन की कमी के कारण सरकारी निष्क्रियता की आलोचना की।