शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

श्री दुर्गादर्शन विशेष बससेवा आगावू आरक्षणाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:19 PM

कोल्हापूर : महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत दि. २१ ते २९ सप्टेंबर अखेर नवरात्र उत्सवानिमीत्य भाविकांच्या सोईसाठी ‘श्री दुर्गादर्शन विशेष बससेवा’ सुरु करण्यात येत आहे. या विशेष बससेवेच्या आगावू आरक्षणाचा मंगळवारी येथील शाहू मैदान नियंत्रण पास विक्री केंद्रावर प्रारंभ करण्यात आला.या दुर्गादर्शन विशेष सेवा प्रवासाचा कालावधी हा ४.४० तास इतका राहणार आहे. ...

ठळक मुद्देकोल्हापूर परिवहन विभागाचा उपक्रम २१ ते २९ सप्टेंबरपर्यत सेवा

कोल्हापूर : महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत दि. २१ ते २९ सप्टेंबर अखेर नवरात्र उत्सवानिमीत्य भाविकांच्या सोईसाठी ‘श्री दुर्गादर्शन विशेष बससेवा’ सुरु करण्यात येत आहे. या विशेष बससेवेच्या आगावू आरक्षणाचा मंगळवारी येथील शाहू मैदान नियंत्रण पास विक्री केंद्रावर प्रारंभ करण्यात आला.

या दुर्गादर्शन विशेष सेवा प्रवासाचा कालावधी हा ४.४० तास इतका राहणार आहे. त्यासाठी प्रौढास ११० रुपये असा तिकीट दर राहील. लहान मुले व उभे राहून प्रवास करणाºया प्रवाशांसाठी ५५ रुपये अशा सवलतीच्या दरामध्ये तिकीट देण्यात येणार आहे. श्री शाहू मैदान नियंत्रण केंद्राच्या ८ कि.मी. परिक्षेत्रातील एकत्रित प्रवास करणाºया ३४ भाविकांसाठी ४२४० रुपये इतका दर ठेवण्यात आला आहे.

या विशेष बससेवेच्या तिकीट अगावू बुकींग सेवेचा प्रारंभ मंगळवारी सकाळी श्री शाहू मैदान पास विक्री केंद्रावर करण्यात आला. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यत अगावू आरक्षण सुरु राहणार आहे. अगाऊ आरक्षण पास धारकांना श्री दुर्गादर्शन प्रवाशांच्या दिवशी आरक्षणाच्या पासवर श्री शाहू मैदान येथे एक वेळ येणे व परत जाण्यासाठी मोफत प्रवास सवलत राहणार आहे.

देवींच्या दर्शनाचा लाभ

या विश्ोष बससेवेमध्ये श्री लक्ष्मीदेवी, श्री एकविरादेवी, श्री गजेंद्रलक्ष्मीदेवी, श्री मुक्तांबिकादेवी, श्री उजळंबादेवी, श्री पद्मावतीदेवी, श्री रेणूकादेवी, श्री त्र्यंबोलीदेवी, श्री फिरंगाईदेवी, श्री कमलजादेवी, श्री महाकालीदेवी, श्री अनुगामीनीदेवी, श्री तुळजाभवानी, श्री महालक्ष्मीदेवी, श्री कात्यायनीदेवी अशा देवींच्या दर्शनाचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.