जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ
By Admin | Updated: January 11, 2016 00:28 IST2016-01-11T00:28:03+5:302016-01-11T00:28:03+5:30
जिल्ह्यात महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला आहे. सप्ताहाचे उद्घाटन आ.द. खोलकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ
संजय पारकर - राधानगरीअभयारण्यातील काही लोभी कर्मचाऱ्यांमुळे वन्यजीव विभागाची अब्रू वेशीवर टांगली आहे. बाहेरच्यांबरोबर येथील कर्मचाऱ्यांकडूनही वन्य जिवांना धोका असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे अधोरेखित होत आहे. यात काही अधिकारीच सामील होतात, हे त्याहून गंभीर आहे. काहींवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे तरी असल्या प्रकारांना आळा बसेल, अशी आशा आहे. या अभयारण्यात डुक्कर, भेकर, ससा, सांबर, साळिंदर, मोर अशा शिकार होणाऱ्या प्राण्यांची संख्या मोठी आहे. शाहू महाराजांच्या काळात शिकारीसाठी राखीव असलेल्या दाजीपूर जंगलाचे १९५८ मध्ये अभयारण्यात रूपांतर करण्यात आले, तर १९८५ मध्ये त्याचा विस्तार करण्यात आला. ३५१.१६ किलोमीटर क्षेत्रफळाच्या राधानगरी अभयारण्याची निर्मिती झाली. पूर्वी येथे शिकारी होत होत्या. मात्र, कालांतराने त्यावर बंधने आली आहेत; पण हे शिकाऱ्यांचे वारस मानायला तयार नाहीत.
जंगलाच्या हद्दीत २५ गावे, वाड्या, वस्त्या आहेत. त्यापैकी अनेकजण शिकारी आहेत. त्यांच्या सहकायार्तून बाहेरून येणारे काही धनिक, राजकारणी लोक आपली मौज करण्यासाठी येथे वारंवार येतात. पर्यटनाच्या नावाखाली शिकारी चालतात. येथील काही शिकारींचा वाटा सर्व संबंधिताना वेळोवेळी पोहोचविला जातो. क्वचित एखादा नवखा सापडला, तर त्याची ‘शिकार’ केली जाते. या अभयारण्यात बिबट्याची शिकार झाली आहे. मात्र, त्यांना कसलीही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे हे लोक निर्ढावले आहेत.
वारंवार घडणारे हे प्रकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहीत नाहीत असे नाही. काहीवेळा अधिकारीच दडपण आणतात, तर काही कर्मचारी तडजोडी करतात, असे अनेकवेळा समोर आले आहे. अर्थात सर्वच अधिकारी, कर्मचारी तसे नाहीत. त्यामध्ये इमाने इतबारे काम करणारेही आहेत; पण त्यांनाच काहीवेळा त्रास झाल्याचे प्रकारही घडले आहेत. वन विभागाचे कायदे पोलिसांपेक्षाही कडक असल्याचे सांगितले जाते. त्यांचा वापर कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी करतात, हे समोर आले आहे. मनात आणले तर या कायद्याचा वापर करून येथील तस्करी, शिकारी यांसारख्या प्रवृत्तींचा समूळ नायनाट शक्य आहे. मात्र, त्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.