पन्हाळा, माणगाव येथील आंबेडकर स्मारक लवकर करा : भीमसेनेतर्फे साखळी उपोषण सुुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:36 IST2018-12-06T16:34:24+5:302018-12-06T16:36:15+5:30

पन्हाळा व माणगाव (ता. हातकणंगले) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक लवकर व्हावे, या मागणीसाठी भीमसेनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Start fasting Ambedkar memorial in Panhala, Mangaon: Bhimsenena launches chain fasting | पन्हाळा, माणगाव येथील आंबेडकर स्मारक लवकर करा : भीमसेनेतर्फे साखळी उपोषण सुुरु

पन्हाळा, माणगाव येथील आंबेडकर स्मारक लवकर करा : भीमसेनेतर्फे साखळी उपोषण सुुरु

ठळक मुद्देपन्हाळा, माणगाव येथील आंबेडकर स्मारक लवकर करा भीमसेनेतर्फे साखळी उपोषण सुुरु

कोल्हापूर : पन्हाळा व माणगाव (ता. हातकणंगले) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक लवकर व्हावे, या मागणीसाठी भीमसेनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीमसेनेतर्फे हे आंदोलन सुरु करण्यात आले. जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. राष्ट्रीय स्मारकाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही हालचाल झालेली नाही.

स्मारकाचा संपूर्ण आराखडा मंजूर करण्याऐवजी काही कामांसाठी निधी मंजूर करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे.

आंदोलनात अध्यक्ष वैभव कांबळे, अमर शिंदे, जयदास कांबळे, अक्षय कांबळे, संदीप कांबळे, अमित आढावा, रणधीर कांबळे, चेतन भंडारे, राहुल कांबळे आदी सहभागी झाले होते.
 

 

Web Title: Start fasting Ambedkar memorial in Panhala, Mangaon: Bhimsenena launches chain fasting