शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

कोल्हापूरच्या विकासासाठीच ‘स्टार एअर’चे आज ‘उडान’ : संजय घोडावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 23:58 IST

विंड टर्बाईन, एफएमसीजी, रिअल इस्टेट, टेक्स्टाईल, एव्हिएशन, फ्लोरिकल्चर या उद्योगांसह एसजीआय इंटरनॅशनल स्कूल, आयआयटी व मेडिकल अकॅडमी, युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात संजय घोडावत ग्रुपने यशाचे शिखर गाठले आहे. आता ‘कनेक्टिंग रिअल इंडिया’ हे ब्रीद घेऊन घोडावत ग्रुप आज, शुक्रवारपासून ‘स्टार एअर’ विमानसेवेच्या क्षेत्रात ‘उडान’ घेत आहे.

ठळक मुद्देबंगलोर, हुबळीतून विमानसेवेची सुरुवातजयसिंगपूरसारख्या शहरात स्थापन झालेली ‘घोडावत एव्हिएशन’ ही भारतातील पहिली हवाई वाहतूक कंपनी आहे

विंड टर्बाईन, एफएमसीजी, रिअल इस्टेट, टेक्स्टाईल, एव्हिएशन, फ्लोरिकल्चर या उद्योगांसह एसजीआय इंटरनॅशनल स्कूल, आयआयटी व मेडिकल अकॅडमी, युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात संजय घोडावत ग्रुपने यशाचे शिखर गाठले आहे. आता ‘कनेक्टिंग रिअल इंडिया’ हे ब्रीद घेऊन घोडावत ग्रुप आज, शुक्रवारपासून ‘स्टार एअर’ विमानसेवेच्या क्षेत्रात ‘उडान’ घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानसेवा सुरू करण्याचा उद्देश, या सेवेचे स्वरूप-वैशिष्ट्ये, घोडावत ग्रुपचे भविष्यातील उपक्रम, आदींबाबत या ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.प्रश्न : विमानसेवा सुरू करण्याची कल्पना कशी सुचली?उत्तर : मला लहानपणापासून विमान, हेलिकॉप्टरची आवड होती; त्यामुळे उद्योग-व्यवसाय सांभाळत मी अमेरिकेमध्ये हेलिकॉप्टर, तर विमान चालविण्याचे शिक्षण-प्रशिक्षण बारामती येथून घेतले. सध्या माझ्याकडे तीन हेलिकॉप्टर आहेत. त्याद्वारे ‘स्टार एअर’ची हवाईसेवा सुरू आहे. सध्या महाराष्ट्रातील रस्त्यांची स्थिती, टोलच्या आकारणीमुळे प्रवासात अधिक श्रम आणि वेळ खर्च होत आहे. शिवाय होणारा त्रास वेगळाच आहे. आयुष्यात वेळ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याची बचत होण्यासाठी हवाई वाहतूक सेवेचा चांगला पर्याय आहे. उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आदी क्षेत्रांतील विकासासाठी ही सेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे ही विमानसेवा सुरू करण्यामागे कोल्हापूरचा विकास हाच मुख्य गाभा आहे. घोडावत एव्हिएशनच्या माध्यमातून ‘स्टार एअर’ विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला, तयारी केली; पण कोल्हापूर विमानतळावर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाली नसल्याने अखेर बंगलोर, हुबळीमधून आम्ही विमानसेवा सुरू करीत आहोत. कोल्हापूर विमानतळाचा रखडलेला विकास ही आपल्या शहराची नामुष्की आहे. कोल्हापूरला उपजत टॅलेंट आहे. लोक हुशार आहेत; परंतु तरीही या शहराचा विकास होत नाही त्यामागे अशी कारणे आहेत. 

प्रश्न : ‘स्टार एअर’ विमानसेवेचे स्वरूप, वैशिष्ट्ये काय आहेत?उत्तर : नुसती शहरे ‘स्मार्ट’ होऊन चालणार नाहीत. देश ‘स्मार्ट’ होणे आवश्यक आहे. त्यासाठी विकासाची क्षमता असणाऱ्या लहान-लहान शहरांमधील पायाभूत सुविधा भक्कम झाल्या पाहिजेत. ही शहरे विमानसेवेच्या माध्यमातून देश, जगाशी जोडली गेली पाहिजेत. त्यासाठी ‘कनेक्टिंग रिअल इंडिया’ हे ब्रीद घेऊन घोडावत एव्हिएशन ‘स्टार एअर’ विमानसेवा पुरविणार आहे. या सेवेची सुरुवात आज, शुक्रवारपासून बंगलोर आणि हुबळी येथून होणार आहे. बंगलोर-हुबळी-तिरूपती ते पुन्हा तिरूपती-हुबळी-बंगलोर अशी विमानसेवा असणार आहे. घोडावत एव्हिएशनकडून जगातील सर्वांत वेगवान विमान एम्ब्रार -ई.आर.जे. १४५ एल.आर.च्या साहाय्याने ही विमानसेवा सुरू होत आहे. सर्वांत जलद, ०.८ मॅक फ्लाइंग स्पीड, यशस्वी उड्डाण, ५० आसनी क्षमता, ३१ इंच प्रशस्त सीट साईज ही या विमानाची खासियत आहे. सर्वांत जलद गतीच्या या विमानाचा वापर करून भारतात हवाईसेवा सुरू करणारी आणि एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या जयसिंगपूरसारख्या शहरात स्थापन झालेली ‘घोडावत एव्हिएशन’ ही भारतातील पहिली हवाई वाहतूक कंपनी आहे. माझा मुलगा श्रेणिक आणि कॅप्टन सिमरन यांच्यासह २०० कर्मचारी ‘स्टार एअर’चे काम सांभाळणार आहेत. 

प्रश्न : कोल्हापूरमधून कधीपासून सेवा सुरू करणार?उत्तर : कोल्हापूरमधून विमानसेवा सुरू करण्याचे स्वप्न घेऊनच आम्ही ‘घोडावत एव्हिएशन’ची सुरुवात केली; पण रन-वे, नाईट लँडिंग, टर्मिनल बिल्डिंगच्या सुविधा कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाल्या नसल्याने ही विमानसेवा कर्नाटकमधून सुरू होत आहे. कोल्हापूर, सांगलीतून वर्षाकाठी सुमारे ५००० कोटींचा महसूल सरकारला मिळतो. मात्र, त्या तुलनेत या जिल्ह्यांतील पायाभूत सुविधांसाठी सरकारकडून निधी उपलब्ध आणि खर्च होत नाही. कोल्हापूर-सांगली आणि सांगली-इस्लामपूर रस्त्यांची दुरवस्था, कोल्हापूर विमानतळावरील पायाभूत सुविधांची कमतरता ही त्याची उदाहरणे आहेत. विमानतळावरील रन-वेची लांबी सहा हजार मीटर करावी. नाईट लॅँडिंगसह अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, पालकमंत्री, आदींकडे गेल्या सात वर्षांपासून माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, आतापर्यंत ठोस असे काहीच झालेले नाही.आगामी चार वर्षांत देशाला दहा हजार वैमानिकांची आवश्यकता आहे. हे वैमानिक घडविण्यासाठी आम्ही कोल्हापूर विमानतळावर ‘फ्लाइंग स्कूल’ सुरू करण्याचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी शासनाला पाठविला. मात्र, त्यावरही काहीच उत्तर मिळालेले नाही. आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास निश्चितपणे कोल्हापूरमधून ‘स्टार एअर’ची विमानसेवा सुरू होईल. 

प्रश्न : घोडावत ग्रुपचे पुढचे पाऊल काय असणार आहे?उत्तर : केवळ विमानसेवाच नव्हे, तर त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ घडविण्यासाठी आम्ही घोडावत विद्यापीठामध्ये ‘एरोनॉटिकल इंजिनिअरिंग’ हा अभ्यासक्रम सुरू केला. इंटरनॅशनल स्कूल आणि विद्यापीठाच्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रुपतर्फे लवकरच लर्निंग अ‍ॅप सुरू केले जाणारआहे. त्यामध्ये ‘एसजीआय’चे सर्व अभ्यासक्रम हे थिअरी आणि प्रॅक्टिकलसह उपलब्ध असणार आहेत. आॅडिओ आणि व्हिडीओ स्वरूपात शिक्षक आणि तज्ज्ञांची लेक्चर्स उपलब्ध असतील. त्याद्वारे विद्यार्थ्यांना आॅनलाईन चाचणी देता येईल. ग्रुपच्या सध्या असलेल्या विविध उद्योगशाखांचे विस्तारीकरण केले जाणार आहे. 

प्रश्न : तुमच्या यशाबद्दल काय सांगाल?उत्तर : घोडावत ग्रुपने उद्योग क्षेत्रात उत्पादनाच्या बाबतीत गुणवत्ता व दर्जा याला कायमच महत्व दिले आहे. ग्राहकांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे काम आमच्या ग्रुपमधील प्रत्येक घटक करीतआहे. त्याच्या बळावर आम्ही यशाची शिखरे पार करीत आहोत. हार्डवर्क, टीमवर्क आणि स्मार्टवर्क हीआमच्या यशाची त्रिसूत्री आहे. आमच्या उद्योगातील प्रत्येक कर्मचाºयाला ही संस्था माझी आहे असे वाटते. ओनरशिपच्या भावनेतून तो काम करतो, हेच आमच्या यशाचे गमक आहे. आम्ही दहा हजार तरुणांना थेट नोकरीची संधी दिली आहे.- संतोष मिठारी

टॅग्स :airplaneविमानbusinessव्यवसायkolhapurकोल्हापूर