कोरोना काळातील सेवेबद्दल कर्मचाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:24 IST2021-04-02T04:24:03+5:302021-04-02T04:24:03+5:30
कोल्हापूर : के. एम .टी. उपक्रमाच्या आर्थिक उत्पन्नात वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगल्या पद्धतीने प्रवासी सेवा देण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी ...

कोरोना काळातील सेवेबद्दल कर्मचाऱ्यांचा सन्मान
कोल्हापूर : के. एम .टी. उपक्रमाच्या आर्थिक उत्पन्नात वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगल्या पद्धतीने प्रवासी सेवा देण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केेले.
महानगरपालिकेच्या के. एम. टी. उपक्रमाचा ५९ वा वर्धापन दिन गुरुवारी साजरा झाला. वर्धापन दिनानिमित्त शास्त्रीनगर येथील यंत्रशाळेत प्रशासक बलकवडे यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सुरुवातीस के.एम.टी.चे संस्थापक कै. श्रीपतराव बोंद्रे यांच्या यंत्रशाळा परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण केला.
वाहतूक विभागाकडील सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुनील जाधव, वाहक अमेय जाधव, चालक मिलिंद सुतार, सुरक्षारक्षक बळीराम पाटील, यंत्रशाळा विभागाकडील वर्क्स मॅनेजर अमरसिंह माने, फिटर ज्ञानोबा शिंदे, हेड पेंटर हेमंत हेडाऊ या कोरोना काळात अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा केल्याबद्दल गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपआयुक्त रविकांत आडसुळ, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक चेतन कोंडे, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार, लेखापाल अरुण केसरकर, खरेदी व भांडार अधिकारी संजय जाधव, वाहतूक निरीक्षक रवी धुपकर, सुपरवायझर दीपक पाटील, धनंजय माने, शंकर जाधव, म. दु. श्रेष्ठी विद्या मंदिर माझी शाळा शिक्षक व विद्यार्थी तसेच सर्व विभागाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०१०४२०२१-कोल-केएमटी
ओळ - कोरोना काळात चांगली सेवा देणाऱ्या केएमटी कर्मचाऱ्यांचा गुरुवारी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपायुक्त रविकांत आडसुळ, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे उपस्थित होते.