ST Strike निपाणी १५०, इचलकंजी १०० रुपये, खासगी वाहतूकदारांची ‘दिवाळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 17:26 IST2018-06-08T17:26:52+5:302018-06-08T17:26:52+5:30
उन्हाळी सुट्टी संपत चालली असल्याने अनेक प्रवाशांनी परतीचा प्रवास करता असतानाच पगारवाढी नामंूजर असल्याने कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केल्याने शुक्रवारी कोल्हापुर विभागीतील अनेक मार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू केली.

राज्य परिवहन महामंडळाने जाहिर केलेली वेतनवाढ काही एस. टी. कर्मचाऱ्यांना अमान्य असल्याने शुक्रवारपासून कर्मचार्यांनी अचानक काम बंद आंदोलन केल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणात बसस्थानकांत अडकले होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : उन्हाळी सुट्टी संपत चालली असल्याने अनेक प्रवाशांनी परतीचा प्रवास करता असतानाच पगारवाढी नामंूजर असल्याने कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केल्याने शुक्रवारी कोल्हापुर विभागीतील अनेक मार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू केली.
राज्य परिवहन महामंडळाचे कोल्हापूर विभागातील कर्मचारी शुक्रवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकत्र येवून त्यांनी शांतपणे संपात सहभागी आहोत, हे दर्शवित होते.मे महिन्याची सुट्टी संपत आल्याने प्रवाशी परतीचा प्रवास करत असल्याने मध्यवर्ती बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यामध्ये अचानक झालेल्या एस.टी बस बंद आंदोलनामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. तर परगावचे प्रवाशी बसस्थानकांवर अडकून पडले.
गाडी आता सुटेल, नंतर सुटेल असे वाटत असताना सुमारे तासाभरानंतर एस. टी. महामंडळाच्या वतीने गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जो-तो प्रवासी मोबाईलवरून आपल्या घरी व नातेवाइकांना गाड्या रद्द झाल्या आहेत. घरी येण्यास वेळ लागेल, असे सांगत होता. यांचा फायदा खासगी बस वाहतूकरदारांनी घेतल्याचे चित्र बसस्थानक परिसरात पाहण्यास मिळाले.
मोबाईल चार्जिंगसाठी शोध ..
आंदोलनामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेषत: महिला, वृध्द आणि लहान मुलांना सांभाळून पावासांच्या दिवसात घरा पर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली. बसस्थानकांवर गाडी वाट पाहणी प्रवासी मोबाईल बॅटरी डाऊन झाल्याने मोबाईल चार्जिंग करण्यासाठी परिसरात फिरत होते, त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.
दरापुढे प्रवासी हतबल...
एस.टी. बंदचा सर्वांत जास्त फायदा खासगी वाहतूकदारांनी उचलला. बसस्थानकांत अडकलेल्या प्रवाशांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी अनेकांनी दुप्पट-तिप्पट दर लावून प्रवाशांची लूटमार सुरू केली होती. इचलकरंजीचा एस.टी.चा तिकीट दर २९ रुपये असताना खासगी वाहनधारक १०० रुपये घेत होते; तर निपाणीसाठी ५२ रुपये तिकीट दर असताना १५० रु., सांगली -मिरजसाठी २०० रुपये तिकीट दर आकारण्यात येत होता. पुणे-मुंबईच्या तिकीटदराबाबत तर मनमानीचाच कारभार सुुरु होता.
रेल्वे फुल्ल
मिरजेहून कोल्हापूरकडे येणाऱ्या व कोल्हापूरहून मिरजेकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या तुडुंब झाल्या होत्या. याचा फटका आरक्षण केलेल्या प्रवाशांना बसला. गर्दीच्या हंगामात संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.