शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पट्टणकोडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेत भंडाऱ्यात लाखो भाविक न्हाले..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 11:51 IST

अनिल बिरांजे पट्टणकोडोली : भंडारा, खारिक, खोबरे, लोकर यांच्या उधळणीत चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी पट्टणकोडोली येथील श्री ...

अनिल बिरांजेपट्टणकोडोली : भंडारा, खारिक, खोबरे, लोकर यांच्या उधळणीत चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-कैताळाच्या निनादात श्री विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलंच्या गजरात फरांडे बाबांनी ऐतिहासिक हेडाम सोहळ्याचे दर्शन घडविले.सकाळपासून ढोल-कैताळाने परिसर दणाणून गेला होता. भंडारा, खारिक, खोबरे, लोकर यांच्या उधळणीने वातावरण भक्तीमय बनले होते. भाकणुकीसाठी विविध राज्यांतून लाखो भाविक मिळेल त्या वाहनाने पट्टणकोडोलीत दाखल झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास मुख्य धार्मिक विधीस प्रारंभ झाला. गावचावडीत मुख्य मानकरी प्रकाश पाटील व रणजित पाटील यांच्या हस्ते मानाच्या तलवारीचे पूजन केले.दुपारी तीन वाजता श्री फरांडेबाबा हातात धारदार तलवार घेऊन उभे राहिले. पोटावर तलवारीने वार करत फरांडेबाबा हेडाम खेळत मंदिराची प्रदक्षिणा घालत मंदिरात आले. त्यानंतर भाकणूक झाली. परिवहन विभागाने विविध भागांतून जादा बसेस सोडल्या. हुपरी पोलिस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.फरांडेबाबांची भाकणूकनऊ दिवसांत पावसाचे कावड फिरेल, पाऊस काळ चांगला राहील: धारणा चढती राहील, महागाई वाढेल, राजकारणात उलथापालथ होऊन भगवा फडकेल, देशाची समान नागरिक कायद्याच्या दिशेने वाटचाल होईल, भारताची महासत्तेकडे वाटचाल होईल, देवाची सेवा करील त्याची रोगराई दूर होईल, अशी भाकणूक फरांडेबाबा यांनी केली.

सात ते आठ लाख भाविकांची उपस्थितीमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांसह आंध्र, तमिळनाडू, गोवा, कर्नाटक राज्यांतून जवळपास सात ते आठ लाख भाविक उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर