शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रोगापेक्षा इलाज भयंकर, कोल्हापुरातील इचलकरंजीत जलपर्णीवर विषारी औषधाची फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 12:35 IST

पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालय नियुक्त पंचगंगा नदीप्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड यांनी विभागीय आयुक्त आणि प्रदूषण मंडळाचे सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हा प्रकार म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकरचा अनुभव आहे.पंचगंगा नदीच्या पात्रात इचलकरंजी ते शिरोळदरम्यान प्रक्रिया न करता सोडलेल्या सांडपाण्यामुळे जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या सर्व घटकांच्या वर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, वाढलेली जलपर्णी काढून टाकून प्रदूषण झालेच नाही, असे दाखवण्याचा उद्देश ठेवून २३ एप्रिल २०२३ रोजी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी रासायनिक विषारी तणनाशक फवारणी ड्रोनच्या मदतीने करण्यात आली.हा नदीचा स्राेत नागरिक व जनावरे यांना पिण्यासाठी आहे. तसेच शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाणी, त्यावरील जलपर्णी, नदीकाठ परिसरात अनेक प्रकारचे किडे, अळ्या, मासे, सरपटणारे प्राणी, पक्षी, प्राणी आदींचा अधिवास असून त्या परिस्थितीमध्ये अनेक अन्नसाखळ्या व अन्नजाळे अस्तित्वात आहे. त्यावर विषारी तणनाशक मारले तर अनेक घटक मृत होऊन ते खाद्य म्हणून इतर कोणत्याही प्राणी- पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर मृत्यू ओढवू शकतो. तसेच पाळीव जनावरे व नागरिकांनादेखील त्या विषाचा त्रास होण्याची शक्यता आहे.जलप्रदूषण कायदा, पर्यावरण कायदा, जैवविविधता कायदा, वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार हा गुन्हा घडला असून त्याबाबत संबंधित अधिकारी व घटक यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, वापरलेली साधने जप्त करावी, पाण्याचे व वनस्पतींचे नमुने संकलित करून ते फ्लाॅरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात यावे. तसेच नदीकाठावर तातडीने जनावरे व नागरिकांनी पाणी वापर करू नये, मासेमारी करू नये, मासे व अन्न प्रादुर्भाव झालेल्या बाबींचे सेवन करू नये, असे आवाहन करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

इचलकरंजी महापालिका रडारवरदरम्यान, अशा पद्धतीने जिल्हास्तरीय समितीला विश्वासात न घेता ही फवारणी केल्यामुळे इचलकरंजी महापालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. मूळ प्रदूषणमुक्तीसाठी ठोस अंमलबजावणी न करता महापालिकेने राबविलेला वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणichalkaranji-acइचलकरंजी