शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा
3
PMC Elections 2026: पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार
4
'त्या' वादग्रस्त मुद्द्यावर BCCI नं आखली 'लक्ष्मणरेषा'; मग खास बैठकीत नेमकं काय शिजलं?
5
अनेक वर्षांपासून बँक अकाऊंटमध्ये पैसे पडलेत? RBI 'या' पोर्टलद्वारे करा चेक, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
6
प्रत्येकाच्या खात्यात ९० लाख जमा करणार! 'या' देशातील नागरिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची थेट ऑफर 
7
Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
8
तेहरानमध्ये रक्ताचा सडा! इराणमध्ये महागाईविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण; २१७ जणांचा मृत्यू
9
"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर
10
मकर संक्रांत २०२६: संक्रांत सण असूनही त्याला 'नकारात्मक' छटा का? रंजक आणि शास्त्रीय कारण माहितीय?
11
Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर; विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य
12
आयफोन, बॉयफ्रेंडला २५ लाखांची कार, ५ कोटींवर डल्ला; हायप्रोफाईल चोरीची धक्कादायक इनसाईड स्टोरी
13
वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
14
मालेगाव मनपा निवडणुकीकडे प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पाठ; प्रचारासाठी शिंदेसेना, भाजपचा स्थानिक नेत्यांवर भर 
15
NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?
16
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा; बॉयफ्रेंडने कडाक्याच्या थंडीत रोमँटिक अंदाजात अभिनेत्रीला दिलं सरप्राईज
17
Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
18
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
19
मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
20
"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून स्ट्राँगरूम, मतमोजणी केंद्राची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:19 IST

बंदोबस्तासाठी एक हजार पोलिसांसह १३०० होमगार्ड, संवेदनशील प्रभागांमध्ये करडी नजर

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी महासैनिक दरबार हॉल येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील स्ट्राँगरूम तसेच रमणमळा येथील स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी केली.महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अंतिम झाल्यानंतर प्रचाराला वेग आला असून मतदानास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत कंट्रोल युनिट स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी फुलारी यांनी संबंधित ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली.मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिल्या. मतमोजणी काउंटरची मांडणी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या ये-जा करण्याची प्रवेश व्यवस्था, मतमोजणी केंद्रापासून कार्यकर्त्यांना थांबविण्याचे अंतर, पार्किंग व्यवस्था तसेच मतदान केंद्रांपर्यंत येणाऱ्या वाहनांच्या नियोजनाबाबत माहिती घेऊन आवश्यक सूचना दिल्या.यावेळी प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के. मंजूलक्ष्मी, सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निऱ्हाळी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भंडारे, उप-आयुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, आदी अधिकारी उपस्थित होते.

बंदोबस्तासाठी एक हजार पोलिसांसह १३०० होमगार्ड, संवेदनशील प्रभागांमध्ये करडी नजरकोल्हापूर : महापालिकांसाठी १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानानंतर १६ जानेवारीला मतमोजणी होत आहे. कोल्हापुरात चार ठिकाणी, तर इचलकरंजीत एका ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची ठिकाणे वाढल्याने पोलिसांनी सशस्त्र बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यासाठी एक हजार पोलिस, १३०० होमगार्ड, एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या प्रत्येकी दोन तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.चुरशीच्या लढतींमुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या प्रभागांवर पोलिसांची नजर आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलेल्या उमेदवारांसह त्यांच्या नातेवाइकांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे. मतांसाठी जेवणावळी, आमिषे, दबाव, पैसे देण्याचे प्रकार घडत असल्यास विभागीय निवडणूक कार्यालयांमध्ये तक्रारी देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.क्रिटिकल मतदान केंद्रे नाहीतकोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही महानगरपालिकांमध्ये एकही क्रिटिकल मतदान केंद्र नाही. तरीही लक्षवेधी आणि चुरशीच्या लढती असलेल्या प्रभागांवर पोलिसांची विशेष नजर आहे. कसबा बावडा, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, क्रशर चौक, संभाजीनगर, रुईकर कॉलनी, सदर बाजार, लक्ष तीर्थ वसाहत परिसरातील काही मतदान केंद्रांवर विशेष नजर राहणार आहे. तसेच या ठिकाणी मतदानावेळी पोलिसांसह एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.कोल्हापुरात चार, इचलकरंजीत एका ठिकाणी मतमोजणीकोल्हापुरात व्ही. टी. पाटील सभागृह, गांधी मैदान, रमणमळा आणि दुधाळी येथे मतमोजणी होईल. इचलकरंजीत राजीव गांधी भवन येथे मतमोजणी होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर सशस्त्र बंदोबस्त तैनात केला जाईल असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

असा असेल बंदोबस्त

  • पोलिस - १०००
  • होमगार्ड - १३००
  • एसआरपीएफ - १८० (दोन तुकड्या)
  • सीआरपीएफ - १८० (दोन तुकड्या)

कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील मतदानासह मतमोजणीचे नियोजन पूर्ण झाले आहे. दोन्ही ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात असेल. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे. अन्यथा दोषींवर कठोर कारवाया केल्या जातील. - योगेश कुमार - पोलिस अधीक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election 2026: Police Review Strongroom, Counting Center Security

Web Summary : Special Inspector General Sunil Phulari inspected Kolhapur's strongrooms and counting centers ahead of municipal elections. He reviewed security arrangements, entry procedures, parking, and vehicle management with officials, emphasizing strict police presence during counting.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६VotingमतदानPoliceपोलिसEVM Machineईव्हीएम मशीन