मतदार नोंदणीसाठी उद्या विशेष मोहीम, आॅनलाईनमधील १३, ७१० अर्जांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 13:06 IST2018-10-27T13:05:58+5:302018-10-27T13:06:58+5:30
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत उद्या, रविवारी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे.

मतदार नोंदणीसाठी उद्या विशेष मोहीम, आॅनलाईनमधील १३, ७१० अर्जांचा समावेश
कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत उद्या, रविवारी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे.
मोहिमेदिवशी प्रत्येक मतदान केंद्रात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी मतदान केंद्रात हजर राहणार आहेत. यावेळी सर्व नागरिकांनी आपले नाव मतदारयादीत समाविष्ट असल्याबाबत खात्री करावी. मतदारयादीत नाव नोंदणीसाठी पात्र आहे; परंतु, अद्यापही मतदारयादीमध्ये नाव नोंद केलेले नाही, अशा नागरिकांनी नमुना क्रमांक ०६ अर्ज भरून त्यासोबत रहिवासी पुरावा व जन्मतारखेच्या पुराव्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कडे (रविवार) करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात १ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत नमुना क्रमांक ६ चे एकूण ६४,९१९ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये आॅफलाईनमधील ५१,२०९ व आॅनलाईनमधील १३, ७१० अर्जांचा समावेश आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.