शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: बहिरेवाडीत मनोरुग्ण मुलाकडून वडिलांचा खून, खुरप्याने केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:12 IST

सचिन हा घरातून बाहेर पडून इतरांना मारेल म्हणून घराचे पाठीमागील व पुढचे दरवाजे बंद केले अन्यथा अनेकांचा जीव गेला असता.

भादवण : बहिरेवाडी (ता .आजरा) येथील मनोरुग्ण असणाऱ्या मुलाने आई-वडिलांवर खुरप्याने केलेल्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. कृष्णा बाबू गोरुले (वय ६५) असे मृताचे नाव असून आई पारुबाई कृष्णा गोरुले (६०) या गंभीर जखमी आहेत. सचिन कृष्णा गोरुले (३२) हा मनोरुग्ण असून रात्री उशिरा आजरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, कृष्णा गोरुले यांचे भैरवनाथ हायस्कूलच्या बाजूला घर आहे. तेथे सचिन हा आई वडिलासोबत रहातो. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याचे आई-वडिलांशी भांडण काढले. यावेळी घरात असणाऱ्या खुरप्याने आईला मारहाण करत जखमी केले. त्या ओरडत घराबाहेर आल्या असता वडील कृष्णा गोरुले यांच्यावर सचिनने खुरप्याने सपासप वार केले. खुरप्याचा वार वर्मी बसल्याने कृष्णा हे रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडले. पारुबाई यांचा आरडाओरड ऐकून घराकडे ग्रामस्थांनी धाव घेतली असता कृष्णा गोरुले हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सचिन हा पुन्हा बाहेर येऊन मारहाण करेल म्हणून ग्रामस्थांनी घराच्या बाहेरून कड्या लावून बंद केले. पारुबाई यांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे नेण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलवले.महालक्ष्मी यात्रेचा जागर असल्याने मुलाने वडिलांना ठार मारल्याचे वृत समजताच घटनास्थळी मोठी गर्दी समजली होती. पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी घटना स्थळी भेट दिली असता घराच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा उघडून प्रवेश केला. सचिन हा घरातील वरच्या माळ्यावर होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर आई-वडिलांना मारहाण केल्याचे कोणतेही दडपण त्याचेवर नव्हते.दोन वर्षांपासून उपचार सचिन याचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता, मात्र तो मनोरुग्ण स्थितीत वावरत असल्याने त्यांन पत्नीपासून तीन वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. वेडाच्या भरात त्याने खुरप्याच्या साह्याने आई-वडिलांवर वार केला. सचिनच्या हातात खुरपे असल्याने वडिलांना मारू लागला त्यातच ते मृत्युमुखी पडले. सचिन हा घरातून बाहेर पडून इतरांना मारेल म्हणून घराचे पाठीमागील व पुढचे दरवाजे बंद केले अन्यथा अनेकांचा जीव गेला असता.यात्रेतील डिजिटलवर शेवटचा फोटो महालक्ष्मी यात्रेसाठी शेतकरी सेवा मंडळाने गावात डिजिटल फलक केले होते. त्या फलकावर कृष्णा गोरुले यांचा डिजिटलवर गावात फोटो लावला तो अखेरचा ठरला. मुलाने वडिलांचा खून केल्याने यात्रेस गालबोट लागले.उत्सव मूर्तीची मिरवणूक सुरूरात्री उशिरा महालक्ष्मीच्या उत्सव मूर्तीची विधिवत पूजा करून गावातून मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. यात्रेच्या जागराच्या वेळी गावात आकस्मिक घटना पहिली घडली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस