शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्पाच्या ठेकेदाराला सोमवारी नोटीस देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST

कोल्हापूर : शहरातील प्रतिदिन १८० टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा ठेका घेतलेल्या कोल्हापूर ग्रीन एजन्सी या कंपनीला ठेका काढून का ...

कोल्हापूर : शहरातील प्रतिदिन १८० टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा ठेका घेतलेल्या कोल्हापूर ग्रीन एजन्सी या कंपनीला ठेका काढून का घेऊ नये अशा आशयाची नोटीस देण्याचे आदेश महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुढील दोन दिवस महापालिकेला सुटी असल्याने अशी नोटीस सोमवारी दिली जाईल.

काेल्हापूर ग्रीन एजन्सी कंपनीने काही कारणांनी दि. १४ जानेवारीपासून घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम थांबविले असल्यामुळे कचरा टाकायचा कुठे, असा गंभीर प्रश्न पालिका प्रशासनासमोर उभा राहिला आहे. लाइन बाजार प्रकल्पस्थळावर आता कचरा टाकण्यास जागाच शिल्लक नसल्यामुळे पालिका प्रशासनाने स्वत:ची यंत्रणा लावून कचऱ्याचे उंच ढिगारे रचून जागा उपलब्ध केली जात आहे; परंतु आता तीही मर्यादा संपली असल्याने कचऱ्याची वाहने तीन ते चार तास थांबून राहत आहेत. शहरातील कचरा उठावाचे कामही संथ झाले आहे.

शहरातील कचरा प्रक्रियेच्या गंभीर प्रश्नाकडे ‘लोकमत’ने शुक्रवारी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याचे पडसाद प्रशासकीय पातळीवर उमटले. शुक्रवारी सुटी असल्याने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे, डॉ. विजय पाटील यांची फोनवर चर्चा झाली. या चर्चेत मोरे यांनी डॉ. पाटील यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली आणि प्रशासकांना माहिती दिली.

बलकवडे यांनी ठेकेदार काम करीत नसेल तर त्यांना तुमचा ठेका का काढून घेऊ नये अशा प्रकारची कारणे दाखवा नोटीस द्यावी, असे स्पष्ट आदेश दिले. त्यामुळे सोमवारी अशा प्रकारची नोटीस ठेकेदाराला देण्यात येणार आहे.

-यापूर्वीही नोटीस दिली होती-

संबंधित ठेकेदारास यापूर्वी काम सुरू करण्याबाबत नोटीस दिली होती, त्यांच्या प्रतिनिधींशी बोलणेही झाले होते; पण त्यांनी प्रकल्प सुरू केलेला नाही. त्यामुळे आता त्यांचा ठेका काढून घेण्यासंदर्भात नोटीस देण्यात येईल, असे डॉ. बलकवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

-कायदेशीर अभिप्रायाच्या प्रतीक्षेत-

बीओटी तत्त्वावर चांगला चाललेला प्रकल्प केवळ ठेकेदाराच्या आर्थिक अडचणीमुळे बंद पडला आहे. त्यामुळे हा प्रकल्प महापालिका ‘टेकओव्हर’ करण्याच्या प्रयत्नात आहे. किमान सहा महिने ठेकेदारास संधी देण्याकरिता हा प्रयत्न असून, यासंदर्भात कायदेशीर अभिप्राय आल्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.