Solarpump - 'Atal' Solar Agricultural Pump in Kolhapur Zone: Waiting for the scheme to be implemented this year. | कोल्हापूर विभागामध्ये साडेदहा कोटींचे सौरपंप-‘अटल’ सौर कृषी पंप : यंदाही योजना लागू होण्याची प्रतीक्षा
कोल्हापूर विभागामध्ये साडेदहा कोटींचे सौरपंप-‘अटल’ सौर कृषी पंप : यंदाही योजना लागू होण्याची प्रतीक्षा

ठळक मुद्देयासाठी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदान

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ‘अटल’ सौर कृषी पंप योजना २ अंतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १० कोटी ४२ लाख रुपये खर्चून ३४६ सौर कृषी पंप बसविले आहेत.
ज्यांंच्याकडे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे; परंतु वीज कनेक्शन नाही, अशांसाठी केंद्र सरकारने ही योजना गेल्या वर्षी सुरू केली होती. अशा पात्र शेतकऱ्यांना तीन आणि पाच एचपीचे एसी आणि डीसी सौर कृषी पंप पुरविले जातात. यासाठी शासनाकडून ९५ टक्के अनुदान देण्यात येते. सर्वसाधारण लाभार्थ्यांना पाच टक्के, तर अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना अडीच टक्के स्वत:ची रक्कम भरावी लागते.

या योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यासाठी १९६ पंपांचे उद्दिष्ट होते, तर १६५ पंप बसविले. सांगली जिल्ह्यात २११ चे उद्दिष्ट असताना १२३ पंप बसविले. रत्नागिरी जिल्ह्यासाठी २१२ पंपांचे उद्दिष्ट असताना तेथे २५, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २०८ पंपांचे उद्दिष्ट असताना तेथे ३३ पंप बसविले आहेत. एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन कोटी ५१ लाख रुपयांचे कृषी सौरपंप बसविण्यात आले आहेत.


यासाठी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदान
कोल्हापूर जिल्ह्यात १९६ पंपांच्या उद्दिष्टांपैकी १६५ पंप बसविण्यात आले.
सर्वसाधारण लाभार्थ्यांना पाच टक्के, तर अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना केवळ अडीच टक्के स्वत:ची रक्कम भरावी लागते.

 

गतवर्षी जाहीर केलेली ही योजना
२८ फेबु्रवारीला संपली. कोल्हापूर व सांगलीच्या तुलनेत या योजनेला रत्नागिरी, सिंधुदुर्गात कमी प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा ही योजना सुरू झाली तर जाणीवपूर्वक कोकणामध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
- एस. ए. पाटील,विभागीय महाव्यवस्थापक,
महाऊर्जा, कोल्हापूर.


Web Title: Solarpump - 'Atal' Solar Agricultural Pump in Kolhapur Zone: Waiting for the scheme to be implemented this year.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.