शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगास धैर्याने सामोरे जाणाऱ्या गायक सोलापुरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:52 IST

प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या व्यासपीठावर केवळ गाण्याच्या अट्टहासामुळे बोनस आयुष्य जगलेल्या हबीबभाई सोलापुरे यांचे (वय ६३) गुरुवारी निधन झाले.

ठळक मुद्देकर्करोगास धैर्याने सामोरे जाणाऱ्या गायक सोलापुरे यांचे निधनहबीबभार्इंना गायनाचा छंद उपयोगी

कोल्हापूर : कोणत्याही गायकाची नक्कल न करता स्वत:च्या आवाजात रसिकश्रोत्यांना तृप्त करणारे कोल्हापुरातील गायक हबीबभाई सोलापुरे कर्करोगाला धैर्याने सामोरे गेले.

प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या व्यासपीठावर केवळ गाण्याच्या अट्टहासामुळे बोनस आयुष्य जगलेल्या हबीबभाई सोलापुरे यांचे (वय ६३) गुरुवारी निधन झाले. त्यांना गुरुवारची संगीत मैफल रद्द न करता प्रतिज्ञा नाट्यरंगने आदरांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, जावई, सासू असा परिवार आहे.गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या हबीबभार्इंना लहानपणापासूनच गाण्यांचा छंद होता. रेडिओवरच्या गाण्यांची शेकडो पारायणे करणाऱ्या हबीबभार्इंचा टेलरिंग व्यवसाय होता. मशीनच्या आवाजाशी एकरूप होत सातत्याने त्यांचा रियाज सुरूच असायचा. अर्धांगिनी, कन्या आणि तरुण मुलाची त्यांना उत्तम साथ होती. त्यांच्यासाठी त्यांनी स्वत:चे घर घेतले; मात्र तरुण मुलाचे २००६ मध्ये अपघातात निधन झाले.

पुत्रवियोगाचे दु:ख असतानाच सन २०११ मध्ये हबीबभार्इंना कर्करोगाने ग्रासले; पण हबीबभार्इंच्या पत्नी आणि मुलींनी तसेच नातेवाईक-मित्रांनी हिंमत न हरता हबीबभार्इंना भक्कम मानसिक आधार दिला. आजारपणामुळे काम झेपत नसल्याच्या विवंचनेतून हबीबभार्इंना त्यांचा गायनाचा छंद उपयोगी ठरला.प्रशांत जोशी यांनी प्रतिज्ञा नाट्यरंगमार्फत हबीबभार्इंना रोजच आनंद मिळावा म्हणून २ एप्रिल २०१९ पासून कोल्हापुरात अखंड ३६५ दिवस ३६५ संगीत मैफलींचे आयोजन केले. १५ आॅगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आयोजित देशभक्तीपर मैफलीचे वेळी तब्येतीचा त्रास होत असूनसुद्धा हट्टाने त्यांनी देशभक्तीपर गीते गायिली. मैफलींच्या १७७ व्या दिवसांपर्यंत त्यांनी गाणी गायिली. त्यानंतर गेले २५ दिवस आजारपणामुळे ते या मैफलीस उपस्थित राहू शकले नाहीत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcancerकर्करोग