शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक, व्यावसायिक हित जपणारा बागवान

By admin | Updated: October 18, 2015 23:47 IST

शहरात दोनशे वर्षांपूर्वीपासून वास्तव्य : मुली शिक्षणात आघाडीवर; पारंपरिकसह अन्य व्यवसायात शिरकाव--लोकमतसंगे जाणून घेऊ--बागवान समाज

एम. ए. पठाण -- कोल्हापूर--आपल्या पारंपरिक व्यवसायाशी एकनिष्ठ असणाऱ्या बागवान समाजाने एकमेकांना साहाय्य करीत समाजात एकजूट कायम ठेवली आहे. या व्यवसायाबरोबर आताची पिढी शिक्षण, नोकरी, उद्योग, डॉक्टर, वकील, आदी विविध क्षेत्रांत नाव उंचावून समाजासाठी भूषणावह ठरत आहे. बागवान समाजाला सातशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. हा समाज संपूर्ण देशात विखुरला आहे. उत्तर प्रदेशात या समाजास राईन, कुजडा, सब्बज्जी फरोश या नावाने ओळखले जाते. मुंबईत हा समाज राईन नावाने ओळखला जातो. बागवान समाजाची म्हैसूर गॅझेट, आॅल इंडिया गॅझेट, तसेच शिवकालीन इतिहासात नोंद आहे. कोल्हापूर शहरात दोनशे वर्षांपूर्वीपासून बागवान समाजाचे अस्तित्व आहे. पूर्वी समाजातील लोक कसबा बावडा, गडमुडशिंगी, वडणगे, आदी परिसरातील शेतजमीन फाळ्यावर कसण्यासाठी घेत असत. या ठिकाणी दररोजचा लागणारा भाजीपाला, फळे, आदी पिकांचे उत्पादन घेत व शहरात येऊन त्याची विक्री करीत असत. यामुळे उत्पादन आणि विक्री असा या समाजाचा व्यवसाय होता. आज काळाच्या ओघात शेती उत्पादन जाऊन फक्त भाजी, फळभाज्या, फळे या उत्पादनांच्या विक्रीचा व्यवसाय समाज करीत आहे. शहरातील मार्केट यार्ड येथे भाजी, फळभाज्यांच्या सौद्यासाठी बागवान समाजाच्या बांधवांची उपस्थिती असते. तसेच त्यानंतर दिवसभर या भाजी, फळभाज्यांची विक्री हा समाज करतो. शहरात आज सात हजारांहून अधिक समाजबांधव आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोमवार पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ या भागात या समाजाची संख्या अधिक आहे, तर जिल्ह्यात हा समाज सर्वसाधारण २५ हजारांपर्यंत आहे.सर्वसाधारण १९२७ला या समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती हुसेन बंडू बागवान, कासम चाँद बागवान, लाला आप्पाभाई बागवान, तत्कालीन रवी बँकेचे संचालक हुसैन गौबी बागवान, तत्कालीन महालक्ष्मी बँकेचे संचालक इब्राहिम हुसेन बागवान, चाँद अब्दुलकरीम बागवान, गुलाब बाबाभाई बागवान, बालम इस्माईल बागल, दादा आप्पा बागवान, एन. बी. बागवान या लोकांनी. यामुळे समाजात निरक्षरतेचे प्रमाण अधिक असतानाही समाजातील समस्या, प्रश्न या लोकांनी सोडविल्यामुळे एकता अबाधित राहिली. तसेच धार्मिक कार्यात हा समाज एकसंघ राहिला.बागवान समाजातील मुले लवकर व्यवसायात उतरत असल्याने त्यांचे शिक्षण कमी आहे. याउलट मुलींनी शिक्षणात आघाडी घेतली आहे. व्यवसायाबरोबरच आताची पिढी शिक्षण, नोकरी, उद्योगपती, डॉक्टर, वकील, पोलीस, महसूल खाते, इंजिनिअर अशा विविध क्षेत्रांत नाव उंचावून स्थिरावताना दिसत आहे. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून अन्य समाजांशी त्यांचा दररोजचा संपर्क येतो. निरूपद्रवी, मनमिळावू स्वभावामुळे या समाजाने कोल्हापुरात आपली वेगळी ओळख जपली आहे.समाजातर्फे विधायक उपक्रम भोई गल्ली येथे बागवान समाजाचा मिनी हॉल आहे. हा हॉल घरगुती व सामाजिक समारंभासाठी सर्व समाजांसाठी अल्प भाड्यावर दिला जातो.बैतूलमाल गोळा करून गरजवंतांपर्यंत पोहोचविण्याचे काम समाजबांधव करतात. याद्वारे गरजू, गरिबांच्या विवाहप्रसंगी होणारा खर्च, औषधोपचारासाठी लागणारा खर्च केला जातो. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजातर्फे गुणगौरव करण्यात येतो. बागवान समाजातर्फे बागवान व्यावसायिक पतसंस्था १९९२ पासून चालवली जाते. याचे कार्यालय मार्केट यार्ड येथे आहे. या संस्थेतर्फे समाजबांधवांना व्यवसायवृद्धीसाठी कर्ज देणे, तसेच बचतीची सवय लावण्यात संस्था यशस्वी झाली आहे. भाजी व्यवसायात कार्यरत असणाऱ्या अन्य समाजातील बांधवांनाही या पतसंस्थेतर्फे सहकार्य केले जाते.समाजातील गरजूंना ओबीसी दाखल्यांसाठी मार्गदर्शन केले जाते.सामाजिक बांधीलकीसामाजिक बांधीलकी जपत हणबरवाडी येथील अंध युवक संघटना राजोपाध्येनगरात कार्यरत असून, येथे २७ मुले राहतात. या संस्थेस लागणारा दररोजचा भाजीपाला समाजाचे उपाध्यक्ष फिरोज बागवान यांच्या पुढाकाराने दिला जात आहे.तसेच समाजातील अन्य बांधवांकडून शिरोली मदरसा व उदगाव येथील मदरसा येथे भाजीपाला दिला जातो. तसेच २00५ मध्ये आलेल्या महापुरादरम्यान हाजी आल्ताफ इलाही बागवान व समाजातील लोकांनी तीन टन गहू, दोन टन तांदूळ कुरुंदवाड येथे पूरग्रस्तांना वितरित केला होता. बोरगाव येथील अन्नछत्रास भाजीपाला पाठविला होता.समाज संघटित करून शैक्षणिक उन्नतीसाठी प्राधान्य दिले जात आहे. यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच समाजाच्या विकासासाठी बागवान समाज एज्युकेशन फौंडेशन कार्यरत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- फिरोजभाई बागवान, उपाध्यक्ष, बागवान समाज