जखमी सांबरावर उपचार करण्याऐवजी तोडली शिंगे, लपविली घरात न्यायालयाने सुनावली कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:53 IST2020-04-17T17:25:41+5:302020-04-17T17:53:28+5:30

मलकापूर -:  ... शाहूवाडी तालुक्यातील कोतोली जंगलात जखमी अवस्थेत असणाऱ्या साबंराची शिंगे कुऱ्हाडीने तोडुन आपल्या घरी लपवून ठेवणाऱ्या संश ...

Soap horns | जखमी सांबरावर उपचार करण्याऐवजी तोडली शिंगे, लपविली घरात न्यायालयाने सुनावली कोठडी

जखमी सांबरावर उपचार करण्याऐवजी तोडली शिंगे, लपविली घरात न्यायालयाने सुनावली कोठडी

ठळक मुद्दे कोतोली जंगलात  कुत्र्यांनी सांबराचा पाठलाग करून त्याला जखमी केले होते .

मलकापूर -:  ... शाहूवाडी तालुक्यातील कोतोली जंगलात जखमी अवस्थेत असणाऱ्या साबंराची शिंगे कुऱ्हाडीने तोडुन आपल्या घरी लपवून ठेवणाऱ्या संश हित आरोपी भास्कर शंकर आनुते , श्रीकांत विलास सांळुखे रा . कोतोली पैकी सोनारवाडी ता . शाहूवाडी या दोघांना वन विभागाने अटक केली . शाहूवाडी न्यायालयासमोर आज त्यांना हजर केले असता त्यांना दि 2० एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावली ,

कोतोली जंगलात चार दिवसा पूर्वी कुत्र्यांनी साबं राला जखमी केले होते . जखमी साबंर जंगलात पडले होते . याची माहिती मिळताच भास्कर आनुते , श्रीकांत साळुखें या दोघांनी साबंराची शिंगे कुन्हाडीने तोडुन घरी लपवून ठेवली होती . याची माहिती वना विभागाचे वनपारी क्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी घटनास्थळी भेट देवून दोघांना ताब्यात घेतले  त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली . याकामी वन विभागाचे वनसरंक्षक हनुमत धुमाळ , सहायक वनसरंक्षक सुनील निकम , वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे वनपाल संजय कांबळे , वनरक्षक जाली दंर कांबळे , दिग्वीजय पाटील आदी सह वनकर्मचारी यांनी सहकार्य केले .

 

Web Title: Soap horns