शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

..तर सीमा समन्वयक मंत्री बेळगावला का गेले नाहीत? आमदार रोहित पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 14:54 IST

राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमाप्रश्न चिघळला आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावमध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांना इशारा दिला होता. बोम्मईंनी दिलेली धमकी धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आज, बेळगावमध्ये दाखल झाले. यानंतर ते कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना सत्ताधाऱ्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले.यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, मी बेळगावला जाऊ शकतो, तर मंत्री का जात नाहीत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. दोनवेळा सांगूनही मंत्री बेळगावला का गेले नाहीत? अशी विचारणा केली. बेळगावात गेल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचीच्या नेत्यांशी, नागरिकांशी चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयत्न सुरु होता, पण शरद पवारांनी अल्टीमेटम दिल्यानंतर वातावरण बदलून गेले. कार्यकर्त्यांना डांबण्याचा प्रयत्न होत होता, पण पवारांनी अल्टीमेटम दिल्यानंतर परिस्थिती निवळली. इव्हेट करायची गरज नाहीबेळगावला मी व्यक्तिगत आणि एक नागरिक म्हणून गेलो. मी आजच नाही तर अनेक वेळा त्याठिकाणी गेलो असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्याठिकाणचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तर ज्या ठिकाणी ज्याचे होते तेथे गेलो ज्यांना भेटायचे होते त्यांना भेटलो असल्याचेही ते म्हणाले. संवेदनशील गोष्टीची काळजी घेण्याची आपली सर्वांची जबाबबदारी असल्याचेही ते म्हणाले.राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅनराज ठाकरेंबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पवार यांनी खोचक शब्दात टिप्पणी केली. मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन असल्याचे ते म्हणाले. मात्र, आता ते कुठेतरी भाजपचा विचार घेऊन पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी आता स्वतःची ओरिजनल स्टाईल कायम ठेवावी. भाजप आपली राजकीय पोळी भाजून घेत असेल, तर त्याला आपण पाठिंबा का द्यायचा? राजकारण हे तात्पुरते असते, विचार हे दीर्घकालीन असतात, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRohit Pawarरोहित पवार